आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेदी सरकारचा अल्पसंख्याकांवर हल्लाबाेल-माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा घणाघात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- राज्य घटनेप्रमाणे देशात सर्वच धर्मांना समान वागणूक मिळणे अभिप्रेत अाहे. परंतु नरेंद्र माेदी पंतप्रधान झाले तेव्हापासून हिंदू राष्ट्र निर्मितीचे काम सुरु झाले अाहे. काेणी काय खावे अाणि काय खाऊ नये हे ठरविण्याचे काम सध्या सरकार करीत अाहे.हिंदू राष्ट्रनिर्मितीच्या नादात अल्पसंख्याक समाजावर हल्ले वाढले अाहे. अाज मुस्लिम अाणि ख्रिश्चन समाज त्यांनी लक्ष्य केले अाहे. यापुढे दलितांवरही हल्ले हाेण्याची शक्यता असल्याचा गंभीर अाराेप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नाशिकमध्ये भगवान महावीर जन्मकल्याणक साेहळ्यानिमित्त अायाेजित व्याख्यानमालेत केला. भाजपला लाेकसभा अाणि राज्यसभा या दाेन्ही सभागृहात बहुमत मिळाले तर ते राज्य घटनाही बदलू शकतात, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 
 
श्री जैन सेवा कार्य समितीच्या वतीने सुरू असलेल्या या व्याख्यानमालेचा समाराेप रविवारी (दि. ९) पृथ्वीराज चव्हाण यांच्या भारतीय लाेकशाहीचे भवितव्य काय?’ या विषयावरील व्याख्यानाने झाला. लाेकसभा निवडणुकीत जवळपास सर्वांचीच भाकीते फसवत भाजपने बहुमत मिळविले असे सांगत चव्हाण पुढे म्हणाले की, ‘अच्छे दिन अायेंगे’सारखी घाेषणा देत माेदींनी जनतेचा विश्वास संपादित करण्यास यश मिळविले. मात्र या घाेषणा पंतप्रधान पदावर अारुढ हाेताच लयास गेल्या. बळकट लाेकशाही शासन व्यवस्था असलेला हा देश माेदी सरकार अाल्यापासून हुकूमशाहीच्या दिशेने मार्गक्रमण करू लागला. देशातील सर्वभाैमत्व धाेक्यात अाले. सध्या मुस्लिम समाजातील लाेकांना मारले जात अाहे. ख्रिश्चन चर्च जाळले जात अाहेत.
 
हिंदू धर्माव्यतिरिक्त जाे समाज अाहे त्यांना खिंडीत गाठून समाचार घेण्याचे काम राज्य व्यवस्थेकडून केले जात अाहे. सर्वसामान्य जनतेने या बाबींना अाताच विराेध केल्यास भविष्यातील धाेक्यांना तेच जबाबदार असतील, असेही चव्हाण यांनी यावेळी नमूद केले. यावेळी व्यासपीठावर माजी अामदार जयप्रकाश छाजेड, संपतलाल सुराणा, किसनलाल बाेरा, बेबीलाल संचेती, सुनील बुरड, प्रवीण खाबिया, राजेंद्र ब्रह्मेचा, देवीलाल संचेती, किसनलाल बाेरा, अाशिष भन्साळी, कांतीलाल बाफणा, लकीचंद पारख, अशाेक बागमार, पारस पिचा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद अाहेर, डाॅ. शाेभा बच्छाव, अाकाश छाजेड अादी उपस्थित हाेते. व्याख्यानमालेस राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम उपस्थित राहणार हाेते. परंतु अाजारपणामुळे त्यांच्या वतीने अॅड. विजय परब उपस्थित हाेते.
 
*लाेकशाही बळकट करण्यासाठी या सुचविल्या उपाययाेजना 

- अांतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून इव्हीएम मशिनची तपासावी विश्वासार्हता. 
-निवडणूक अायाेगाने राजकीय पक्षांचे अार्थिक लेखापरीक्षण करावे. 
-राजकीय पक्षाला माहितीचा अधिकाराच्या कक्षेत अाणावे. 
- एका राज्यातील निवडणूका एकाच वेळी घेण्यात याव्यात. 
-हुकूमशाही रुढ हाेणार नाही याची प्रत्येक नागरिकाने काळजी घ्यावी. 
- लादलेल्या जाचक अटी कायदेशीर मार्गाने रद्द कराव्यात. 
पृथ्वीराजचव्हाण यांच्या दृष्टिकाेनातील नरेंद्र माेदी 
-डाेनाल्ड ट्रम्प अाणि नरेंद्र माेदी यांची हुकूमशाहीच्या दिशेनेच वाटचाल 
- भारतात अल्पसंख्याकांवर हल्ले तर अमेरिकेत भारतीयांवर हल्ले 
- व्यक्तिकेंद्रित निवडणुकीचा माेदींनी पाडला पायंडा 
- माेदी हिंदू धर्माविषयी बाेलत नाहीत; त्यांच्या बगलबच्च्यांकडून मात्र धार्मिक विधाने करवून घेतात 
-छाेट्या-छाेट्या घटनांवर व्टीट करणारे माेदी माेठ्या घटनांबाबत साेयीस्कर माैन बाळगतात 
- माेदींनी पद्धतशीरपणे अडवाणी, मुरली मनाेहर जाेशी, यशवंत सिन्हा यांना दुधातल्या माशीसारखे बाहेर काढले 
-ज्येष्ठांना ठेवला नाही मार्गदर्शन करण्याचाही अधिकार 
-देशात सध्या नरेंद्र माेदी अाणि अमित शहा असेच ‘टू मॅन गर्व्हमेंट’ 
- ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ ही माेदींची घाेषणा अाता अाश्चर्यकारकरित्या गायब झाली 
भाषणातील महत्त्वाचे मुद्दे 
-हिंदी भाषा, साेशल मीडिया अाणि माध्यमांचा प्रभावी वापर केल्यामुळे भाजपला बहुमत 
- लाेकसभा निवडणुकीचे पाऊल अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीच्या दिशेने 
- भाजपकडे मंत्र्यांची माेठी फळी नाही; जाणीवपूर्वक एकाधिकारशाहीकडे प्रवास 
- मंत्रिमंडळांच्या बैठकाही हाेतात माेदींच्या तालावर 
-काेणतेही मंत्रालय स्वयंप्रेरणेने काम करताना सध्या दिसत नाही 
-अधिकारांच्या विकेंद्रीकरणापाेटीच पर्रीकर यांनी संरक्षणमंत्रिपदाचा राजीनामा देऊन पुन्हा छाेट्या राज्याचे मुख्यमंत्रिपद पुन्हा स्वीकारले 
- याेगी अादित्यनाथ यांच्या वक्तव्यांमुळे देशात असुरक्षिततेची भावना 
-निवडणुकांत वाढलेल्या विकृतीला थाेपविणेही निवडणूक अायाेगाला शक्य झाले नाही 
बातम्या आणखी आहेत...