आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्मी दर्शन’वर करडी नजर; नाशकात दारू, 35 हजार जप्त (महाकाैल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नाशिक - महानगरपालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येला साेमवारची (ता. २०) रात्र पोलिस यंत्रणेने अक्षरश: जागून काढली. उमेदवारांकडून हाेणाऱ्या अाेल्या पार्ट्यांसह रात्रीच्या वेळी ‘लक्ष्मी दर्शन’ हाेण्याचे प्रकार लक्षात घेता पोलिस प्रशासनाकडून नाशिक शहर व परिसरातील हॉटेल, लॉज,आणि फार्म हाऊस आदी ठिकाणी चेकिंग आणि नाकेबंदी करण्यात अाली हाेती. उशिरापर्यंत  ही धडक कारवाई सुरू होती. दरम्यान, साेमवारी शहरातून ३५ हजार रुपये जप्त करण्यात अाले.
 
निवडणुकीच्या पूर्वसंध्येला पाेलिसांकडून सुरू असलेल्या नाकाबंदीत मद्यसाठा वाहतूक करत असलेली एक कार साेमवारी रात्री चोपडा लॉन्स परिसरात जप्त करण्यात अाली. या वाहनातील सुमारे ७० हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला व कारमधील तिघांना अटक करण्यात अाली.
 
 पांढऱ्या रंगाच्या तवेरा कारमधून विदेश मद्य वाहतूक होत असल्याची माहिती सरकारवाडा पोलिसांना मिळाली होती. साेमवारी मध्यरात्री पथकाने चोपडा लॉन्स येथे सापळा रचून संशयीत  कार पकडली. या कारच्या सीटखाली विदेशी मद्याचे खोके सापडले. त्यावरुन पाेलिसांनी महेश  प्रल्हाद भारती, भिला राजाराम पवार, शिवराम माधवराव भावसार या तिघांना अटक केली
बातम्या आणखी आहेत...