आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: विधानसभा अधिवेशनाचे 10 तास 13 मिनिटे वाया; प्रश्नांवर चर्चेसाठी वेळच नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- राज्य विधिमंडळाचे अधिवेशन म्हणजे सर्वसामान्यांच्या समस्यांचे निराकरण होणारे व्यासपीठ मानले जाते. मंत्री, आमदार, विरोधी  पक्षाचे नेते यांच्या अभ्यासपूर्ण चर्चेकडे राज्यातील नागरिकांचे लक्ष असते. नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी  अधिवेशनात आमदारांनी आरोग्य, शेती, शिक्षण, पायाभूत सुविधा आदी  विषयांवर सर्वाधिक प्रश्न विचारले. मात्र, या प्रश्नावर तपशीलवार चर्चा झाली नाही.

विधिमंडळ कामकाज
विधान परिषद- एकूण : ७४ तास ४३ मि.
दररोज सरासरी : ५ तास २० मिनिटे
मंत्री नसल्याने : २ तास ३२ मिनिटे वाया
अन्य कारणाने : २० तास ४९ मि. वाया
 
विधानसभा- एकूण : ९६ तास
दररोज सरासरी : ६ तास ५१ कामकाज
मंत्री नसल्याने : १० मिनिटे वाया
अन्य कारणाने : १० तास ४३ मि. वाया

२५ वर आमदारांनी मांडलेले प्रश्न
- मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण
- शासकीय वसतिगृहातील लैंगिक अत्याचार
- मुंबईतील अवैध गर्भपात केंद्र
- कोल्हापूरमध्ये धाडीतील रकमेचा पोलिसांनी केलेला अपहार
- आमदार निवासातील लैंगिक अत्याचार
- मुंबईतील उत्तरपत्रिका चोरी प्रकरण
- ठाणे पाणीपुरवठा
- अन्न, औषधे व धान्य भेसळ
- गारपिटीने शेतीचे झालेले नुकसान
- झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे प्रस्ताव

सर्वाधिक आमदारांनी विचारलेले टॉप १० प्रश्न
६७ आमदार
राज्यात कुपोषणामुळे बालकांच्या मृत्यूंमध्ये झालेली वाढ
 
६६ आमदार
राज्यातील ५२१ नागरिकांना स्वाइन फ्लूचा संसर्ग होऊन १०६ रुग्णांचा झालेला मृत्यू
 
६५ आमदार
राज्यातील हृदयरोग शस्त्रक्रियेस वापरल्या जाणाऱ्या सामग्रीचा पुनर्वापर करून तसेच मोतीबिंदू व तत्सम शस्त्रक्रियेस वापरण्यात येणाऱ्या लेन्सची जास्त किंमत आकारून रुग्णांची होत असलेली फसवणूक
 
५२ आमदार
राज्यातील अनेक खासगी शाळांनी केलेली फीवाढ
 
४२ आमदार
शेतकऱ्यांनी कर्जामुळे केलेल्या आत्महत्या
 
४२ आमदार
मान्यता नसताना शाळांनी विद्यार्थ्यांना दिलेले प्रवेश
 
४२ आमदार
रद्द करण्यात आलेल्या ९२ लाख रेशन कार्डांवर सुरू धान्यपुरवठा
 
४१ आमदार
मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गास जमिनी देण्यास राज्यातील शेतकऱ्यांचा होत असलेला विरोध
 
४१ आमदार
राज्यातील शिक्षकांची ३२ हजारांहून अधिक रिक्त असलेली पदे
 
३४ आमदार
राज्यातील आदिवासी भागातील मुलांसाठी इझी नट पेस्ट पाकिटे
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, अधिवेशनात आलेल्‍या प्रश्‍नांची टक्‍केवारी...
 
बातम्या आणखी आहेत...