आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या काठिण्य पातळीत झाली वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांसाठी रविवारी (दि. १०) राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०१६ घेण्यात आली. उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक, सहायक विक्रीकर आयुक्त, मुख्याधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार यांसह विविध पदांच्या १०९ जागांसाठी ३७ मुख्य केंद्रांवर ही परीक्षा झाली. पूर्वपरीक्षेतील पेपर क्रमांक मध्ये वेगवेगळ्या विषयांचा अंतर्भाव असलेले संमिश्र स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आल्याने परीक्षेतील काठिण्य पातळी वाढल्याच्या प्रतिक्रिया परीक्षार्थींनी व्यक्त केल्या.

लोकसेवा आयोगातर्फे २०१५ मध्ये विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यानंतर विविध पदांसाठीच्या १०९ जागांसाठी राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०१६ घेण्यात आली. शहरातील २९ केंद्रांवर घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी एकूण ११ हजार ७६२ परीक्षार्थींपैकी हजार ८९४ उमेदवारांनी हजेरी लावली. सामान्य अध्ययनाचा पेपर एक २०० गुण, तर पेपर साठी २०० अशा एकूण ४०० गुणांसाठी सकाळ दुपार अशा दोन सत्रांत परीक्षा घेण्यात आली. पेपर एकमधील प्रश्नांचे स्वरूप संमिश्र स्वरूपाचे राहिले. काठिण्य पातळी वाढल्याने उत्तरे लिहिताना चांगलीच कसरत करावी लागली. परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनातर्फे एक हजार १२ अधिकारी कर्मचाऱ्यांनी नियोजनाचे काम पाहिले.

एकूण परीक्षार्थी- ११७६२
गैरहजर- २८६८
हजर- ८८९४
ओळखपत्र छायांकित प्रत अनिवार्य केल्याने अडचणी
उमेदवारांनामूळ ओळखपत्राशिवाय दुसऱ्या ओळखपत्राची छायांकित प्रत आणणे अनिवार्य करण्यात आले होते. परंतु, अनेकांनी ही प्रत आणल्याने सुरुवातीला परीक्षार्थींना अडचणी आल्या. मात्र, परीक्षेचे मूळ ओळखपत्र असल्याने परीक्षार्थींना परीक्षेस बसता आले.

मुख्य परीक्षेची तयारी सुरू करावी
- पूर्वपरीक्षेतीलपेपरमध्ये अनेक प्रश्नांचा काठिण्य स्तर वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे परीक्षार्थींनी कट-ऑफ काय लागतो, याकडे लक्ष देण्याऐवजी मुख्य परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास सुरू करावा. अवांतर वाचन, क्रमिक पुस्तके यांसह इंटरनेटचा अाधार घेऊन परीक्षेची तयारी करावी. - डॉ. जी. आर. पाटील, स्पर्धापरीक्षा मार्गदर्शक
पुढीसस्लाइड्सवर पाहा, या पदांसाठी झाली परिक्षा....