आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजगार हमी योजनेसाठी ७६६ कोटींचा आराखडा, ही कामे होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर- महात्मागांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यात ७६६ कोटी ६२ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. कुशल अकुशल स्वरूपातील कामांतून गावानिहाय कामे उपलब्ध करण्यात येणार असून, ऑक्टोबर अखेरीस गावशिवार फेरीनंतर प्रत्यक्षात कामांना सुरुवात होऊ शकेल.
१५ ऑगस्टसह विशेष ग्रामसभांत कामांची मागणी, गावपातळीवर करावयाची कामे, त्यातून मिळणारा रोजगार यावर चर्चा झाली. काही ग्रामपंचायतींत वादळी सभाही झाल्या. ग्रामसभेने सुचविलेल्या कामांचे मूल्य ठरविण्यात आल्यानंतर पंचायत समिती स्तरावर वर्षभराचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. ११८ ग्रामपंचायतींनी १२८ गावांसाठी हजार १८४ कामे सुचविली. १३४ कोटी ७० लाख ९४ हजार रुपयांची कामे कुशल अकुशल स्वरूपात वर्गीकृत करण्यात आली आहेत.

१४कामे सुरू
पाथरेबुद्रुक, पाथरे खुर्द, रामपूर, नायगाव, मोह आदी गावांत १४ ठिकाणी कामे सुरू झाली आहेत.
वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन अशा स्वरूपाच्या कामांतून तातडीने रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.

शासकीय विभागाकडून ३१ कोटींची कामे
महसूल,कृषी, वनविभाग, लघुपाटबंधारे आदी विभागाकडून हजार १४० कामांचे प्रस्ताव करण्यात आले असून, त्यासाठी ३१ कोटी ९२ लाख अंदाजित खर्च येणार आहे. यातूनही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करण्यात येणार आहेत. २४७ अपूर्ण स्थितीतील कामेही आराखड्यात प्रस्तावित आहेत.

जॉब कार्ड देऊ महिनाभरात सर्वेक्षण
ऑक्टोबरमहिन्यात कामांचे शासकीय यंत्रणेमार्फत सर्वेक्षण केले जाणार असून, त्यानंतर प्रत्यक्षात कामे सुरू होणार आहेत. कामाची आवश्यकता, प्रत्यक्ष स्थिती, सुचविलेले काम याचा ताळमेळ घातला जाणार आहे.

मातीबांध, नालाबांध, वनराईबंधारा, समतलचर, सामूहिक शेततळी, पाझर तलाव, साठवण तलाव, वळण बंधारा, वृक्ष लागवड, वैयक्तिक लाभात सिंचन विहिरीसह शेळ्यांसाठी शेड, कुक्कुटपालनासाठी शेड आदी कामे प्रस्तावित केली आहेत. सिंचनसाठी कालवा दुरुस्ती, बंधाऱ्यांचे नूतनीकरण, अस्तरीकरण, विहिरीतील गाळ काढणे, फळबाग लागवड, विहीर पुनर्भरण.

कामाचीमागणी होताच मजुरांची नोंदणी करून त्यास जॉब कार्ड दिले जाईल. यापूर्वी मजुरांची नोंदणी झाली आहे. ग्रामसेवकांमार्फत काम चालते. दत्तावायचळे, विशेष कार्यक्रम अधिकारी नायब तहसीलदार