आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘समृद्धी’ला विरोध म्हणून शेतकऱ्यांनी रचल्या चिता, नाशिकमध्ये सामुदायिक अात्महत्येचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांनी बळाचा वापर केला तर सरळ सरणावर जायचे... - Divya Marathi
पोलिसांनी बळाचा वापर केला तर सरळ सरणावर जायचे...
सिन्नर - मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गाच्या विरोधाची नाशिक जिल्ह्यात अांदाेलनाची तीव्रता वाढत चालली अाहे. रविवारी धार शिवडे (ता. सिन्नर) येथील शेतकऱ्यांनी बळजबरीने जमिनी घेतल्यास अात्महत्येचा इशारा दिला अाहे. त्यासाठी ग्रामस्थांनी स्वत:चीच चिता रचली तसेच  झाडाला दोर बांधून गळफास घेण्याचा इशाराही दिला आहे. ‘मोजणीसाठी अधिकाऱ्यांकडून बळाचा वापर झाल्यास सरणावर अधिकाऱ्यांसोबत चितेवर आहुती द्यायची, असा अाक्रमक पवित्राही या शेतकऱ्यांनी घेतला आहे.

शिवडेसह नाशिक जिल्ह्यातील ४९ गावांतील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी सामूहिक आत्महत्येचा इशारा दिला आहे. शिवडे गावात शेतकऱ्यांनी शेतात, घरासमोर अंगणात चिता रचून अापल्या जमिनी वाचविण्यासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी केली आहे. याशिवाय गावात ४५ ठिकाणी बांधांवर फासही लटकावण्यात आले आहेत. या महामार्गासाठी एक इंचही जमीन न देण्याचा निर्धार करत जिल्ह्यातील ४९ गावांतील शेतकऱ्यांनी शनिवारी सरकारी दरपत्रकाची होळी केली.  रविवारी अनेक गावांत झाडांवर दोरखंडाचे फास लटकावले.  सरणही रचले असून बळाचा वापर करून जमिनी घेण्याचा शासनाकडून प्रयत्न झाल्यास सामूहिक आत्महत्या करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. 
 
दरम्यान, मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठी सरकारने शुक्रवारी दर जाहीर केले. यात जिरायती जमिनीला सरासरी हेक्टरी ५० लाख रुपये दर मिळणार आहे. किमान ४० लाख रुपये ते ८५ लाख रुपये हेक्टरी भाव असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी दिली.
 
विरोध कायम    
भूसंपादनासाठी दर जाहीर केल्यानंतरही शिवडे गावातील अनेक शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध मात्र कायम आहे. ‘आम्हाला २ कोटी रुपये एकरी दिले तरी आम्ही जमीन सोडणार नाही’, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता. बारमाही विहिरी, बागायती शेती सर्व सोडून जायचे कुठे? असा सवालही ते करत अाहेत.    
 
या शेतकऱ्यांनी रचल्या चिता: अरुण हारक, उत्तम हारक, हरिभाऊ शेळके, भास्कर वाघ, नंदू शेळके, निवृत्ती चव्हाणके, रावसाहेब हारक, सोमनाथ वाघ, कारभारी हारक, किरण हारक, काळू हारक, राजाराम हारक, अंबादास वाघ, ज्ञानेश्वर चव्हाणके, खंडू चव्हाणके, रामनाथ वाघ यांच्यासह शिवडा गावातील बहुतेक शेतकऱ्यांनी शेतात, घरासमोरील अंगणात चिता रचल्या आहेत.   
 
असे आहे प्रकरण    
मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांचा विरोध डावलून मोजणी सुरू केल्याने रोष व्यक्त होत आहे. मुंबई-नागपूर हा समृद्धी महामार्ग राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या महामार्गासाठी सरकारने जमीन संपादन करण्यास सुरुवात केली. पण कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय हे संपादन होत असल्याचा दावा प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. त्याविरोधात सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत.
 
पुढील स्लाइडवर वाचा, 
> घरासमोर अंगणांत चिता
> हा राज्याच्या कृषी समृद्धीचा महामार्ग - मुख्यमंत्री
बातम्या आणखी आहेत...