आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: पालिकेची काेट्यवधींची वाहने पडूनच, अनेक रुग्णवाहिकांची झाली तुटफूट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाहने धूळखात पडून - Divya Marathi
वाहने धूळखात पडून
दरवर्षी महापालिका प्रशासनाकडून काही कोटी रुपयांच्या वाहनांची खरेदी केली जाते. मात्र, या वाहनांच्या वापरासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन केले जात नसल्याने ही वाहने धूळखात पडल्याचे डी. बी. स्टारच्या पाहणीत समोर आले आहे. पंचवटी विभागीय कार्यालयाजवळील वाहन दुरुस्ती केंद्रात धूळखात पडलेली ही काही काेटींची वाहने कुजून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. यावर डी. बी. स्टारचा प्रकाशझोत.... 
 
शहरातील कोणत्याही शासकीय कार्यालयात गेल्यावर बहुतांश कार्यालयांच्या आवारात ही भंगारात काढलेली वाहने डी. बी. स्टारच्या पाहणी अाढळून अाली. या वाहनांचा लिलाव वेळेत झाल्यामुळे दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत अाहे. यात ट्रक, जिप्सी, मॅक्स, अॅम्बेसेडर, पाण्याचे टँकर आदी प्रकारची वाहने गेल्या अनेक वर्षांपासून धूळखात पडलेली आहेत. कामकाजातून काढलेली ही वाहने विनाकारण पडून तर आहेच, उलट त्यांच्या सुरक्षिततेवर खर्च करावा लागत आहे. कोणतेही शासकीय वाहन जर भंगारात काढले असेल तर खरेतर शासकीय नियमानुसार त्याचा लिलाव करणे आवश्यक आहे. पण, या वाहनांचा मागील कित्येक वर्षांपासून लिलाव होत नसल्यामुळे त्यांची स्थिती खराब असल्याचे डी. बी. स्टारसमोर आले आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या आरोग्य यांत्रिकी विभागाने सप्टेंबर २०१२ मध्ये ४० लाख रुपये खर्च करून ‘कार्डियाक ट्रामा अॅम्ब्युलन्स’ या रुग्णवाहिका खरेदी केल्या होत्या. मात्र, त्याचा उपयोगच केला जात नसल्याचे समोर आले आहे. 
 
चांगल्या कारही भंगारात 
या विभागात अनेक गाड्या गेल्या वर्षभरापासून धूळखात पडलेल्या आहेत. यात ट्रक, जिप्सी, मॅक्स, अॅम्बेसेडर, पाण्याचा टँकर आदींचा समावेश आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या सभागृहनेत्यांसाठी नवीन कार घेण्यात आली. त्यांची जुनी कार चांगल्या स्थितीत असतानादेखील त्या कारला या भंडारात टाकण्यात आले आहे. तसेच एका वरिष्ठ अधिकाऱ्यासाठी घेतलेली अत्याधुनिक कारदेखील या ठिकाणी गेल्या वर्षभरापासून धूळखात पडलेली आहे. अधिकारी अाणि लाेकप्रतिनिधींच्या या कृतीला काय म्हणावे, यावर नियंत्रणही काेणाचेच नाही. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, 
- ‘स्पेअर पार्ट‌्स’ची चोरी 
- अनेक रुग्णवाहिकांची झाली तुटफूट 
- किरकोळ वस्तू नसल्यामुळे भंडारात 
- कर्मचाऱ्यांअभावी अॅम्ब्युलन्स पडली बंद
- ड्रायव्हर नसल्याने वाहने उभी... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...