आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मनसे’सह महाआघाडीचे गुफ्तगू...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापालिकेच्या शिक्षण समिती सभापतिपदाची निवडणूक रंगात आली असून, मनसेसह आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे महापौरांचे निवासस्थान ‘रामायण’ येथे रात्री उशिरापर्यंत ‘गुफ्तगू’ सुरू होते. अपक्षांसह काँग्रेसने सभापतिपदासाठी अर्ज दाखल केले असून, गुरुवारी अखेरच्या दिवशी कोण अर्ज भरतो, हे बघूनच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
महापालिकेचे शिक्षण मंडळ बरखास्त करून शिक्षण समिती अस्तित्वात आली. शिक्षण समिती सभापती उपसभापतिपदासाठी शनिवारी (दि. ४) निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. २) सकाळी ११ ते दुपारी वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असून, बुधवार (दि. १)पर्यंत अपक्ष आघाडीचे संजय चव्हाण, तर काँग्रेसच्या वत्सला खैरे योगिता आहेर या दोघांनी अर्ज नेले. दरम्यान, राष्ट्रवादीकडून सुनीता निमसे चर्चेत असून, मनसेकडूनही काही इच्छुकांनी दंड थोपटल्याने या पार्श्वभूमीवर सभापतिपदाची निवडणूक चुरशीची झाली आहे.
दरम्यान, तिरुपती येथील देवदर्शन आटोपून परतलेल्या उपमहापौर गुरुमित बग्गा यांच्या उपस्थितीत सायंकाळी बैठकीची पहिली फेरी पार पडली. त्यानंतर रात्री महापौरांच्या उपस्थितीत बैठक झाल्याचे सांगितले जाते.