आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: कचऱ्यातील प्रचार साहित्य उचलत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने केली स्वच्छता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाेल्फ मैदानावरील प्रचार साहित्य उचलताना भाजपचे मध्य-पश्चिम मंडल अध्यक्ष देवदत्त जाेशी, युवा माेर्चाचे शहर सरचिटणीस अमित घुगे, निखिल उगले, कुणाल निफाडकर अादी. - Divya Marathi
गाेल्फ मैदानावरील प्रचार साहित्य उचलताना भाजपचे मध्य-पश्चिम मंडल अध्यक्ष देवदत्त जाेशी, युवा माेर्चाचे शहर सरचिटणीस अमित घुगे, निखिल उगले, कुणाल निफाडकर अादी.
नाशिक - महापालिका निवडणुकीनिमित्त गाेल्फ क्लब मैदानावर अायाेजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभेनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मैदानावरच प्रचाराचे साहित्य टाकून दिले हाेते. रविवारच्या अंकात ‘दिव्य मराठी’ने याबाबतचे छायाचित्र प्रसिद्ध केल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तत्काळ या मैदानावरील प्रचारसाहित्य उचलत तेथील स्वच्छता केली. 
 
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या अावाहनानंतर देशभर स्वच्छता अभियान राबविले जात अाहे. या अभियानासाठी केंद्र राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात अाहेत. असे असतानाही नाशिक महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकांनिमित्त गाेल्फ क्लब मैदानावर अायाेजित मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपचे झेंडे, बॅनर, गळ्यातील पट्ट्या असे प्रचाराचे साहित्य मैदानातच टाकून दिले हाेते. कचऱ्यात पडलेल्या या प्रचारसाहित्याचा फाेटाे रविवारच्या (दि. २६) ‘दिव्य मराठी’त प्रसिद्ध हाेताच भाजपचे मध्य-पश्चिम मंडल अध्यक्ष देवदत्त जाेशी, युवा माेर्चाचे शहर सरचिटणीस अमित घुगे, निखिल उगले, कुणाल निफाडकर अादींनी त्या ठिकाणी जाऊन कचऱ्यात पडलेले प्रचारसाहित्य गाेळा करून कारमध्ये टाकून नेले. तसेच, तेथील कचरादेखील साफ करून पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’ला हातभार लावला. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...