आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन अामदारांच्या प्रभाग मध्ये जबरदस्त चुरस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तीनअामदार, शिवसेनेचे महानगरप्रमुख, चार माजी नगरसेवक इच्छुक असलेले अनेक अाजी-माजी पदाधिकारी यांचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक ची निवडणूक यंदा कमालीची रंगतदार हाेणार अाहे. अारक्षण साेडतीत खुल्या गटाचेच प्राबल्य राहिल्यामुळे या प्रभागांत इच्छुकांची संख्या वाढणार अाहे. भाजप अाणि शिवसेनेने कंबर कसली असून, काँग्रेस अाणि राष्ट्रवादीच्या इच्छुकांनीही माेर्चेबांधणी सुरू केली अाहे. मनसेला मात्र उमेदवाराचा शाेध घ्यावा लागणार अाहे.
घारपुरे घाट, रुंग्ठा हायस्कूल परिसर, गाेळे काॅलनी, मल्हारखाण, पाेलिस हेड क्वार्टर, केटीएचएम, पंडित काॅलनी, राठी अामराई, पाटील लेन परिसर, मामा मुंगी कार्यालय, थत्तेनगर, प्रसाद मंगल कार्यालय, अयाचितनगर, डाॅन बाॅस्काे स्कूल परिसर, डिसूझा काॅलनी या भागांचा समावेश प्रभाग मध्ये अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार या प्रभागात ४४ हजार ४०१ लाेकसंख्या अाहे. त्यात ३९ हजार १०२ इतकी जनरल अाणि अाेबीसी या दाेन संवर्गातील अाहे. अवघी हजार ८० इतकी लाेकसंख्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती संवर्गाची अाहे. ही बाब लक्षात घेता या प्रभागात खुल्या गटातून अाणि अाेबीसी संवर्गातून उमेदवारी करण्यास इच्छुक असलेल्यांची संख्या सर्वाधिक असणे स्वाभाविक अाहे. प्रभागातील या सामाजिक परिस्थितीला अारक्षण साेडतीचाही चांगला काैल मिळाला अाहे. या प्रभागात दाेन जागा महिलांच्या खुल्या गटासाठी, तर एक जागा अाेबीसी संवर्गासाठी अारक्षित झाली अाहे. एका जागेवर खुल्या गटातून निवडणूक हाेणार अाहे. त्यामुळे जवळपास सर्वच दिग्गजांना या प्रभागातून निवडणूक लढविणे अाता साेयीचे झाले अाहे. अारक्षणाने काेणाचे पत्ते कट केलेले नाहीत, ही बाब येथे महत्त्वाची अाहे.
भाजप शिवसेनेला लाभदायक असा हा प्रभाग अाहे. सध्याच्या प्रभाग १४ चे प्रतिनिधित्व भाजप अामदार प्रा. देवयानी फरांदे शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बाेरस्ते करीत अाहेत. तर, प्रभाग १५ चे नेतृत्व भाजप अामदार सीमा हिरे डाॅ. राहुल अाहेर करीत अाहेत. अामदारकीमुळे संबंधित लाेकप्रतिनिधी पालिकेची निवडणूक लढणार नसले तरी त्यांच्या जागेवर अाप्तस्वकीयांनाच संधी देण्याची दाट शक्यता अाहे. फरांदेंचा मुलगा किंवा मुलगी, सीमा हिरे यांचे पती, मुलगी किंवा दीर डाॅ. राहुल अाहेर यांची बहीण किंवा काकू निवडणुकीत दावेदारी करू शकतात. उर्वरित एका जागेचा तिढा मात्र डाेकेदुखी ठरणार अाहे. या जागेसाठी माजी नगरसेवक सुरेशअण्णा पाटील, मधुकर हिंगमिरे, पश्चिम मंडल अध्यक्ष देवदत्त जाेशी हे दावेदारी करू शकतात. भाजप व्यापारी अाघाडीचे मनीष रघुवंशी, राजेंद्र सूर्यवंशी, स्वाती भामरे हेही दावेदार असतील. दुसरीकडे, सेनेच्या वतीने महानगरप्रमुख अजय बाेरस्ते, राष्ट्रवादीतून सेनेत अालेले माजी नगरसेवक गाेकुळ पिंगळे यांची उमेदवारी जवळपास निश्चित अाहे. शिक्षण मंडळ उपसभापती राजेंद्र देसाई यांची पत्नीही निवडणूक लढविण्याच्या तयारीत अाहे. त्यामुळे उर्वरित एक जागा काेणाला द्यावी, असा प्रश्न सेनेसमाेर उभा ठाकेल. गेल्या वेळी चांगली लढत दिलेले शरद देवरेही दावा करू शकतात. निवास माेरे हेही उमेदवारीसाठी प्रयत्न करतील. काँग्रेसकडून महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा डाॅ. ममता पाटील या उमेदवारी करू शकतात. राष्ट्रवादीकडून किशाेर शिरसाठ तयारीत असून, त्यांच्याबराेबर अरविंद कारे यांची स्नुषा सुनील धुमणे हे दावेदारी करू शकतात. अन्य पक्षांत उमेदवारी मिळाल्याने नाराज झालेल्यांकडे मनसेचा कल असेल असे दिसते. या पक्षातून पारंपरिक प्रतिस्पर्धी मंगला तांबंेचे नाव चर्चेत अाहे. प्रभागाच्या अारक्षणानुसार खुल्या अाेबीसी या दाेन्ही पर्यायांपैकी एकाची निवड अजय बाेरस्ते, सीमा हिरे, गाेकुळ पिंगळे, डाॅ. राहुल अाहेर यांना करता येणार अाहे.

झाेपडपट्ट्यांवर असेल लक्ष
प्रभागात मल्हारखाण, मंगलवाडी, मिलिंदनगर, वाईकरवाडा, काकड बाग, कस्तुरबानगर, घारपुरे घाट या परिसरात झाेपडपट्टीधारक अाहेत. या परिसरातील मतदारही निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
बातम्या आणखी आहेत...