आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकीय पक्षांच्या गर्दीत ‘तिसऱ्या अाघाडी’साठी प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांनी कंबर कसली असताना अाता काही बड्या उमेदवारांनी एकत्र येऊन ‘तिसऱ्या अाघाडी’च्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचे ठरविले अाहे. या अाघाडीमुळे काेणत्याही राजकीय लाटेचा फटका अापल्याला बसणार नाही, असा दावा संबंधितांकडून केला जात अाहे.
प्रभागरचना जाहीर हाेऊन दाेन महिने उलटल्यानंतरही अनेक इच्छुक उमेदवारांचे पक्ष अद्याप निश्चित झालेले नाहीत. यापूर्वी निवडणुकीपूर्वीच इच्छुकांचे पक्ष निश्चित असायचे. यंदा मात्र निवडणूक ताेंडावर अाल्यावर अनेकांचे पक्ष निश्चित हाेत अाहेत. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे अनेक प्रबळ नेत्यांना संधी मिळणार अाहे. त्यातच यंदा शिवसेना अाणि भाजपला ‘अच्छे दिन’ असल्याचा अंदाज लावला जात असल्याने अन्य पक्षांना घाम फुटला अाहे. काही निवडक प्रभाग वगळता बहुतांश प्रभागांत या पक्षांना उमेदवार मिळणेही मुश्कील झाले अाहे. इतकेच नाही तर संबंधित पक्षाचे विद्यमान उमेदवारही अापल्या पक्षाकडून निवडणूक लढविण्याबाबत साशंक अाहेत. दुसरीकडे शिवसेना अाणि भाजपमध्ये माेठ्या प्रमाणात ‘इन कमिंग’ झाले अाहे. त्यामुळे या पक्षांमध्ये प्रवेश करूनही उमेदवारी मिळेलच याची शाश्वती देता येत नाही. या पार्श्वभूमीवर संबंधित उमेदवार अाता एकमेकांच्या संपर्कात अाले असून, तिसऱ्या अाघाडीची स्थापना करण्याचे जवळपास निश्चित करण्यात अाले अाहे. यात पंचवटी, पश्चिम विभाग अाणि नाशिकराेड परिसरातील काही अाजी-माजी नगरसेवकांचा समावेश अाहे.

तिसरी अाघाडी का?
काँग्रेस राष्ट्रवादीत अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या काही अाजी - माजी नगरसेवकांना अचानक पक्ष बदलणे पचनी पडत नसल्याचे दिसते. त्यात धर्मनिरपेक्ष पक्षातून अचानक धर्मवादी पक्षात प्रवेश केल्यास ‘तत्त्व अाणि निष्ठां’च्या बाबतीतील टाेमणे जनतेकडून एेकावे लागतील, अशीही भीती संबंधितांना भेडसावत अाहे. या पार्श्वभूमीवर तिसरी अाघाडी स्थापल्यास धर्मवादी पक्षात गेल्याचा संकाेचही वाटणार नाही अाणि पारंपरिक पक्षाच्या गढूळ वातावरणाचा फटकाही बसणार नाही, अशा विचाराने संबंधित एकत्र येत अाहेत.
बातम्या आणखी आहेत...