आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका निवडणुकीसाठी 1483 उमेदवारांचे अर्ज, अखेरच्या दिवशी 1565 उमेदवारांचे अर्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीची शुक्रवारी (दि. ३) सांगता झाल्यानंतर ३१ प्रभागांतील १२२ जागांसाठी २१६१ अर्ज, तर १४८३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले अाहेत. अखेरच्या दिवशी उमेदवारांचे १५६५ अर्ज दाखल झाले. दरम्यान, अाता फेब्रुवारीच्या माघारी मुदतीनंतर काेण रिंगणात उरते, यावर चित्र स्पष्ट हाेणार अाहे. 
 
महापालिका निवडणुकीसाठी फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत हाेती. प्रमुख पक्षांच्या उमेदवारी यादी जाहीर करण्याच्या घाेळामुळे शुक्रवारी अंतिम दिवशी गर्दी उसळली. त्यामुळे अनेक ठिकाणी गाेंधळ झाला. अखेरच्या दिवशी सर्व्हर डाऊन असल्यामुळे अाॅनलाइन उमेदवारी अर्ज भरण्यात अडचणी अाल्या. प्रामुख्याने सर्वच प्रभागांत दुपारी १२ वाजेनंतर उमेदवारांची गर्दी उसळली. अखेरच्या दिवशी ३१ प्रभागांतून उमेदवारांचे १५६५ अर्ज दाखल झाले. २७ जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत २१६१ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात अाले. 

अाज उमेदवारी अर्जांची छाननी : दरम्यान,फेब्रुवारी राेजी उमेदवारी अर्जांची छाननी असणार असून, त्यानंतर फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत अाहे. त्यात प्रामुख्याने फेब्रुवारी फेब्रुवारी रोजी अर्ज माघारी घेण्याची मुदत अाहे. 

प्रभाग मधील सेनेच्या उमेदवारांचे एबी फॉर्म जमा 
प्रभागमधील शिवसेनेच्या उमेदवारांचे एबी फॉर्म भगवान भोगे यांना मिळाले, मात्र त्यावर उमेदवाराचे नाव नसल्याने सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनी चारही एबी फॉर्म जमा करून घेत एबी फॉर्मवर नाव नसल्याने अर्ज घेण्यास नकार दिला. वाद झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला. विनानावाच्या एबी फॉर्मबाबत निवडणूक अधिकारी आणि पक्ष यांच्या पातळीवर शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत निर्णय होणार आहे. 

सहा प्रभागांचा घाेळ 
रात्री वाजले तरी प्रभाग क्र. १३, १४, १५, १६, २३ ३० या प्रभागांमधून नेमके उमेदवार किती, याची माहितीच निवडणूक अधिकारी महापालिकेला देऊ शकले नाहीत. याची माहिती रात्री उशिरा ११ वाजता देण्यात अाल्यानंतर उमेदवारांची संख्या स्पष्ट झाली. 
 
बातम्या आणखी आहेत...