आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या 51 उमेदवारांच्या हातातोंडातील घास गेला... वाचा निकालात दुसऱ्या क्रमांकाची मतं

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - काेणतीही लाट नसताना भाजपचे कमळ ६६ जागांवर फुलले असले तरी, मतदानापूर्वी भाजपविराेधातील वातावरणामुळे शिवसेना प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरेल अशी अटकळ केवळ पक्षातील गटबाजी अन्य कारणामुळे खाेटी ठरल्याचे अाता स्पष्ट झाले अाहे. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी, शिवसेनेचे ५१ उमेदवारांच्या विजयाचा हाताताेंडाचा घास गेल्यामुळे पालिकेवर भगवा फडकवण्याचे उद्धव ठाकरे यांचे स्वप्न अर्धवटच राहिले अाहे. 
 
या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवत विक्रम रचला. यापूर्वी भाजपची परिस्थिती अत्यंत वाईट हाेती. सेना मनसेला धरून सत्तेतील दुय्यम पदे या पक्षाने उपभाेगली. यंदा मात्र केंद्र राज्यातील सत्तेचे बुस्ट असल्याने भाजपने शत प्रतिशतचा नारा देत महापालिकेवर चाल केली. उमेदवारीसाठी पैसे घेणे, गुंडांना उमेदवारी, अंतर्गत वाद अन्य कारणांमुळे भाजपविराेधात जनमत तयार हाेऊ लागले, त्याचा फायदा सेनेला मिळेल अशी भाकिते वर्तवली गेली. अगदी मतदानापूर्वी मतदानानंतरही भाजपला ३८ ते ४० जागा मिळतील सेना पन्नाशी गाठील असेच अंदाज हाेते. मात्र, ते फाेल ठरले. सेनेच्या उमेदवारांना तब्बल ५१ ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आहेत. यामध्ये मनीषा हेकरे, दीपक पिंगळे, ॲड. यतिन वाघ, शेख मुजाहिद, सचिन मराठे, शैलेश ढगे, नयना घोलप, वंदना बिरारी आदी दिग्गजांचा समावेश अाहे. 
 
..तर भाजपचा शंभर प्लसचा दावा ठरू शकला असता खरा 
भाजपने ६६ जागावर मुसंडी मारली असली तरी, ३९ जागांवरील दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार विजयी झाले असते तर शंभर प्लसचा दावा खरा ठरता असता. दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळविणाऱ्या भाजप उमेदवारांमध्ये प्रामुख्याने चंद्रकला धुमाळे, संजय पाटील, प्रेरणा बेळे, उज्ज्वला हिरे, सुनंदा मोरे, सुदाम कोंबडे, सतीश मंडलेचा, प्रा. कुणाल वाघ यांचा समावेश आहे. 

मनसे सहा ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर; दाेन्ही काँग्रेसची वाताहत 
गेल्यावेळी ४० नगरसेवक निवडून अाणणाऱ्या मनसेला यंदा दुसऱ्या क्रमांकावरही पाेहाेचता अाले नाही. नवनिर्माणाचे स्वप्न दाखवून कामांचे ब्रॅण्डिंग केल्यानंतरही त्यांचे पाचच नगरसेवक निवडून अाले. सहा ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाच्या शर्यतीत मनसे अाहे. कॉँग्रेसचे अवघे चार तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आठच उमेदवार दुसऱ्या क्रमांकांवर होते. बसपा माकप प्रत्येकी दोन ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर अाहेत. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, निकालात दुसऱ्या क्रमांकाची मतं...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...