आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: ईव्हीएमची अंत्ययात्रा; डाव्यांचा निषेस, केरळमधील हिंसेविरोधात शहरात तीव्र निदर्शने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नाशिक - महानगरपालिका निवडणुकीत ईव्हीएम यंत्रणेत फेरफार करण्यात आल्याचा आरोप सर्वच राजकीय पक्षांच्या पराभूत उमेदवारांकडून केला जात असताना शहरातील छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडने बुधवारी (दि. १) जुन्या नाशकात ईव्हीएम मशिनची अंत्ययात्रा काढत मशिनमधील गोंधळाबद्दल निवडणूक आयोगाचा निषेध केला. 

जुन्या नाशकातील चौकमंडई परिसरात बुधवारी (दि. १) छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने काढण्यात आलेल्या ईव्हीएम मशिनच्या अंत्ययात्रा आंदोलनात छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजिज पठाण, योगेश मिसाळ, प्रफुल्ल पाटील, अॅड. सुजाता चौदंते, दुप्पाळ अंबोरे, इब्राहिम अत्तार, राजाभाऊ जाधव, बशीर शेख, विराज दाणी, रफिक साबीर, किरण बिरकर आदी उपस्थित होते. राज्य निवडणूक आयोगाकडून घेण्यात आलेल्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर याद्यात घोळ फेरफार हे जाणून-बुजून करण्यात आल्याचे दिसत असल्याचा आरोप ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला. तसेच, मतदानाच्या दिवशी आलेल्या निकालामुळे मतदान यंत्रणेतदेखील काही फेरफार झाला असावा, असे वाटत आहे. हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक घेण्यात यावी, तसेच संपूर्ण मतदान याद्यांमध्ये दुरुस्ती करून त्यात मतदारांची नावे टाकण्यात यावीत, अशी मागणी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली. छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने चौकमंडई येथील वाकडीबारवपासून ते शिवाजी पुतळ्यापर्यंत ही अंत्ययात्रा काढण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, केरळमधील हिंसेविरोधात शहरात तीव्र निदर्शने...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...