आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन पालिका शाळांच्या खासगीकरणाचा घाट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गाेरगरीबमुलांना शिक्षण देवून सुशिक्षित करण्यासाठी धडपड करणाऱ्या महापालिकेने एकापाठाेपाठ एक शाळांचे खासगीकरणाचे धाेरण स्वीकारले असून बी. डी. भालेकर शाळेपाठाेपाठ अाता सातपूरमधील दाेन तर पंचवटीतील गणेशवाडीच्या एका शाळेचे खासगीकरण केले जाणार अाहे. दरम्यान, पालिका शाळा काेमजत असताना विद्यार्थ्यांचा टक्का वाढवण्याच्यादृष्टीने चर्चा घडवण्यापेक्षा मागील दरवाज्याने शाळांचे खासगीकरण हाेत असल्यामुळे शिवसेनेने अाक्रमक पवित्रा घेतला अाहे. 
 
महापालिकेच्या १२६ प्राथमिक शाळा तर १३ माध्यमिक शाळा अाहेत. या शाळांमध्ये प्राथमिकमध्ये ३१ हजार तर माध्यमिकमध्ये ३३८३ विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळांमध्ये प्रामुख्याने ज्यांची अर्थिक परिस्थिती नाजूक अाहे, खासगी शाळेतील वार्षिक हजारापासून तर २५ हजारापर्यंतची फी देणे परवडत नाही, असे विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र गेल्या काही दिवसापासून पालिकेच्या शाळांतील विद्यार्थीसंख्या कमी असल्याचे कारण देत खासगीकरणाद्वारे अन्य संस्थांना या शाळा देण्याचा सपाटा सुरू झाला अाहे. यापुर्वी घासबाजार येथील शाळा रेहनुमा उर्दु स्कुलला देण्यात अाली. त्यानंतर बी. डी. भालेकर शाळा येवल्यातील खासगी शिक्षण संस्थेला देण्याचा घाट घातला गेला. अाता सातपूरमधील दाेन शाळा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेला तर गणेशवाडीतील एका शाळा इंग्रजी माध्यमाच्या खासगी संस्थेला देण्याचा ठराव करण्यात अाला. विशेष म्हणजे हे अशासकीय ठराव असून त्यांना फारसे महत्त्वही देता मंजूर करण्यात अाले अाहे. त्यास विराेधी पक्ष नेता अजय बाेरस्ते यांनी अाक्षेप घेत गाेरगरिबांच्या शिक्षणाचे प्रवाह खंडित करण्याचा अधिकार काेणी दिला असा सवाल केला. भाजपाने याविषयावर सभागृहात चर्चा करून त्यानंतर खासगीकरणाचा निर्णय घेतला पाहिजे. मुख्य म्हणजे, शिक्षण मंडळाचे अधिकारी नेमके काय करीत अाहे. पटसंख्या कमी असेल तर शाळाबाह्य मुलांचे सर्वक्षण करून विद्यार्थी संख्या वाढवली पाहिजे. गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजे मात्र पालिकेच्या शाळा खासगीकरण करून नेमके काेणाचे संवर्धन केले जात अाहे हाच प्रश्न अाहे. 

फुकट शिक्षण देणार की भरडणार 
^पालिकेेच्या शाळाखासगीकरणातून माेठ्या संस्थाना दिल्या जाणार. मग येथील विद्यार्थ्यांचे काय, त्यांना माेफत शिक्षण देणार की त्यांचे नुकसान करणार असे असंख्य प्रश्न अाहेत. यावर चर्चा घडवली पाहिजे. -अजय बाेरस्ते, विराेधी पक्षनेता , महापालीका 
 
बातम्या आणखी आहेत...