आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेच्या मलजलावर एकलहरा अाैष्णिक विद्युत प्रकल्पाची मालकी, केंद्राच्या निर्देशानुसार कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकाक्षेत्रातील प्रक्रिया करून गाेदावरीतील साेडलेल्या पाण्यावर काेणाची मालकी, यावरून अनेक वर्षांपासून पाटबंधारे महापालिका यांच्यात सुरू असलेला वाद अाता निकाली निघणार असून, केंद्र शासनाच्या शहर विकास खात्याच्या अादेशानुसार अाता महापालिका क्षेत्रापासून २५ किलाेमीटर अंतरापर्यंतच्या थर्मल पाॅवर स्टेशनसाठी हे पाणी देण्याचा निर्णय झाला अाहे. त्यानुसार एकलहरा विद्युत प्रकल्पासाठी पालिकेने प्रक्रिया करून नदीत साेडलेले पाणी अधिकृतरीत्या दिले जाणार असून, त्याचा सकारात्मक परिणाम म्हणजे गंगापूर धरणात एकलहरा प्रकल्पासाठी अारक्षित पाणी भविष्यात टंचाई निर्माण झाल्यास पालिकेला मिळणार अाहे.
धरणावर पाटबंधारे खात्याची मालकी असून, नाशिक महापालिकेला गंगापूर, गाैतमी-गाेदावरी, काश्यपी या धरणांतून पाणीपुरवठा हाेता. या पाण्याच्या बदल्यात पालिकेला पाटबंधारे खात्याला पाणीपट्टी देते. त्यामुळे पालिका पाटबंधारे खात्याकडून एकप्रकारे पाणी विकतच घेते. हे पाणी शहरात वापरल्याानंतर सांडपाण्याच्या रूपाने भुयारी गटार याेजनेद्वारे मलजल शुद्धीकरण केंद्रांत एकत्र हाेते. त्यानंतर प्रक्रिया करून हे पाणी गाेदावरी वा नजीकच्या नदीत साेडले जाते. नदीपात्रावर मालकी असल्यामुळे या पाण्यावरही पाटबंधारे खात्याने दावा करीत मध्यंतरी इंडिया बुल्सला प्रकल्पासाठी लागणारे पाणी करारनामा करून देण्याचा निर्णय घेतला. याउलट पालिकेने प्रक्रिया करून साेडलेले पाणी अामच्या मालकीचे म्हणत त्या बदल्यात माेबदला मागितला हाेता. बरेच दिवस पाटबंधारे पालिकेत या मुद्यावरून वाद सुरू हाेता. पालिकेने एकतर २५ काेटी रुपयांचा एकत्रित माेबदला द्यावा किंवा मलजल शुद्धीकरण केंद्रांची देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी घ्यावी असा प्रस्ताव ठेवला, मात्र पाटबंधारे खात्याने प्रस्ताव धुडकावला हाेता. पालिकेचे पाणी फुकटात जात असल्याचे बघून पदाधिकारी हळहळले हाेते. दरम्यान, अाता पाण्याची चिंता मिटणार असून, केंद्राच्या नवीन अादेशानुसार प्रक्रिया केलेले मलजल नजीकच्या विद्युत प्रकल्पासाठी द्यावे लागणार अाहे. महापालिका क्षेत्रात एकलहरा वीज प्रकल्प असल्यामुळे अधिकृतरीत्या हे पाणी द्यावे लागणार अाहे. तसेही यापूर्वी नदीपात्रातील हे पाणी विद्युत प्रकल्पासाठीच जात हाेते.

९०० दशलक्ष घनफूट पाण्याची बचत
गंगापूरधरण समूहातून ९०० दशलक्ष घनफूट पाणी साधारण एकलहरा विद्युत प्रकल्पासाठी अारक्षित असते. या प्रकल्पासाठी प्रक्रिया केलेले मलजलही उपयुक्त अाहे. दरराेज प्रक्रिया केलेले जवळपास २०० एमएलडी पाणी गाेदापात्रात साेडले जाते. त्यामुळे हे पाणी प्रकल्पासाठी पूरक अाहे. भविष्यात मलजलावर कायमस्वरूपी एकलहऱ्याचा दावा झाल्यास त्यांच्या वाट्याला गंगापूर धरण समूहात गृहीत धरलेल्या पाण्याची बचत हाेणार अाहे. पर्यायाने टंचाईकाळात शहरासाठी या पाण्यावर दावा ठाेकण्याची पालिकेलाही संधी असेल.
बातम्या आणखी आहेत...