आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ना.शि.प्र. मंडळाच्या 18 हजार विद्यार्थ्यांचा सूर्यनमस्कार,‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाने वर्षभरात एक कोटी सूर्यनमस्कारांचा संकल्प करून नवीन इतिहास घडविल्याने या घटनेची जागतिक रेकॉर्डसाठी नोंदणी झाली. हे रेकॉर्ड नाशिकच्या शहराच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणार आहे, असे प्रतिपादन ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पवन सोलंकी यांनी केले. 
 
सूर्यनमस्कार उपक्रमाचा शुभारंभ नाशिकरोड येथील यू. एस. जिमखाना मैदानावर झाला. त्यावेळी पवन सोलंकी बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, इंडिया सिक्युरिटी प्रेसचे डेप्युटी जनरल मॅनेजर के. के. मुजुमदार उपस्थित होते. 
 
या वेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष महेश दाबक, उपाध्यक्ष डॉ. सुनील कुटे, सेक्रेटरी ज्ञानेश्वर कुलकर्णी, उपाध्यक्ष श्रीपाद देशपांडे, रेकॉर्ड कमिटीचे सदस्य दिनेश पैठणकर, सदस्या अलका कुलकर्णी मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे उपास्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सेक्रेटरी ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी केले. 
 
या वेळी ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पवन सोलंकी यांनी नोंदणीचे पत्र संस्थेचे कार्याध्यक्ष महेश दाबक संस्थेचे सेक्रेटरी ज्ञानेश्वर कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्द केले. यानंतर क्रीडाशिक्षक सुरेश गायधनी यांनी सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक करत विद्यार्थ्यांकडून समंत्र सूर्यनमस्कार करून घेतले. यात १० अंकात १३ सूर्यनमस्कार समंत्र करून घेतले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्राची सराफ यांनी केले.
 
 या उपक्रमाचे प्रमुख प्रदुम्न जोशी यांनी आभार मानले. यावेळी सहसचिव प्रसाद कुलकर्णी, सर्व संकुलप्रमुख, प्राचार्य प्र. ला. ठोके, डॉ. समीर लिम्बारे, मुख्याध्यापिका धामणे, मंगला गोविंद, ज्योती मोदियानी सर्व शाळांचे पदाधिकारी उपस्थित होते. 
 
नाशिकरोड येथे सूर्यनमस्कार एक अाविष्कार कार्यक्रमात पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल, श्रीमती र. ज. चौहान (बि.) गर्ल्स हायस्कूल, आरंभ महाविद्यालय, महिला महाविद्यालय, नवीन मराठी शाळा, टिबरेवाला इंग्लिश मीडियम स्कूल या शाळांमधील हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. 
या कार्यक्रमासाठी नाशिकरोड संकुलातील सर्व सेवक, कला क्रीडा शिक्षकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम झाला. अशाप्रकारे एकूण नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाशिक, नाशिक रोड, इगतपुरी, नांदगाव सिन्नर या संकुलातील २५ शाळांमधील १८ हजार विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार केला. 
 
संस्थेच्या विविध शाळांमध्ये एकाच दिवशी १८ हजार विद्यार्थ्यांनी समंत्र सूर्यनमस्कार सादर केले. मराठी कॅलेंडरनुसार रथसप्तमी-२०१७ ते रथसप्तमी-२०१८ सूर्यनमस्कार एक अाविष्कार या वर्षभराच्या उपक्रमाची नोंद ‘लिम्का रेकॉर्ड’मध्ये होणार आहे.