आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडको प्रशासनाची मुजोरी कायम; कागदपत्रे औरंगाबाद नेण्याचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - नाशिक मधील सिडको प्रशासकीय कार्यालय औरंगाबाद येथे स्थलांतर करण्याला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली असतानाही सिडको प्रशासकांनी थेट या आदेशालाच केराची टोपली दाखविली आहे. येथील शासकीय कागदपत्रे ट्रकमधून औरंगाबादला नेण्याचा त्यांचा प्रयत्न आमदार सीमा हिरे यांच्या सतर्कतेमुळे रोखला गेला. सिडकोच्या प्रशासकांची मुजोरी यानिमित्ताने समोर आली असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 
 
अनेक दिवसांपासून सिडको कार्यालय औरंगाबाद येथे स्थलांतर होणार अशी चर्चा होती. याबाबत सिडको कार्यालयाकडून दुजोरा मिळाल्यानंतर त्याला दुजोरा मिळाला होता. नागरिकांनी आमदार सीमा हिरे यांच्याकडे धाव घेत याबाबत आवाज उठविण्याची विनंती केली. आमदार हिरे यांनी हा प्रश्न थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेच मांडला. मुखमंत्र्यानी तत्काळ दखल घेत स्थलांतराला स्थगिती दिली. 
 
असे असतानाही शुक्रवारी (दि. २१) सिडको प्रशासकीय कार्यालयातून महत्त्वाची कागदपत्रे औरंगाबाद येथे ट्रकमधून नेली जात होती. याबाबत आमदार हिरे यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहाेचून हा सर्व प्रकार थांबविला. 

सिडको कार्यालय स्थलांतरास विराेधच 
^सिडको प्रशासकांच्या मुजोरीला आम्ही अजिबात भीक घालणार नाही. सिडकोच्या कार्यालयाचे स्थलांतर कदापि होऊ दिले जाणार नाही. याबाबत पुन्हा मुख्यमंत्री संबंधितांकडे पाठपुरावा करून सिडकोच्या नागरिकांना न्याय दिला जाईल. -सीमा हिरे, आमदार