आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयजयकार महावीरांचा; जयघाेष सत्य, अहिंसेचा, हजारो जैन बांधवांचा सहभाग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भगवान महावीर जयंतीनिमित्त रविवारी शहरात अतिशय उत्साहात आणि जल्लोषाच्या वातावरणात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत हजारो जैन बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. - Divya Marathi
भगवान महावीर जयंतीनिमित्त रविवारी शहरात अतिशय उत्साहात आणि जल्लोषाच्या वातावरणात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत हजारो जैन बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
 
नाशिक : सत्य, अहिंसा, अपरिग्रहाचा संदेश देणारे जैन धर्माचे संस्थापक भगवान श्री महावीर यांच्या जयंतीनिमित्त शहरात रविवारी शाेभायात्रा काढण्यात अाली. सिडकाे, सातपूर, नाशिकराेड येथेही मिरवणूक काढण्यात अाली. यानिमित्त विविध प्रकारच्या स्पर्धा, रक्तदान शिबिर असे विविध सामाजिक उपक्रम सामाजिक संस्थांकडून राबविण्यात अाले. 
 
भगवान महावीर जयंतीनिमित्त रविवारी शहरात अतिशय उत्साहात आणि जल्लोषाच्या वातावरणात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत हजारो जैन बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 

सिडकोत मिरवणूक, हजारो जैन बांधवांचा सहभाग 
सिडको-‘भगवान महावीर की जय, जय जिनेंद्र’ असा जयघोष करीत सिडकोत भव्य मिरवणूक पार पडली. सकल जैन समाज सिडको यांच्या वतीने महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. म.सा. पुण्यशिलाजी, म.सा. कीर्तीशिलाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम पार पडले. यावेळी संपूर्ण भागात धार्मिक वातावरण तयार झाले होते. 
 
राणाप्रताप चौक, त्रिमूर्ती चौक, सावतानगर, पवननगर आदी परिसरातून मिरवणूक काढण्यात अाली. ढोलपथकांच्या गजरात शाही रथात भगवान महावीरांची मूर्ती प्रतिमा विराजमान करण्यात आली होती. जैन बांधवांनी यात सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राजमल चोरडिया, प्रकाश नहाटा, दादाजी ओस्तवाल, प्रकाश खिंवसरा, अनिल कर्नावट, सतीश सुराणा, पंकज चतुरमुथा, डॉ. संदीप मंडलेचा, राजू लोढा, मनीष डुंगरवाल, जितेंद्र लोढा, महावीर लुणावत, संजय ओस्तवाल यांनी प्रयत्न केले. पवननगर येथील जैन मंदिरात कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी गुरू महाराजांनी मार्गदर्शन केले. 

महावीर जयंतीनिमित्त रंगली भक्तिगीत स्पर्धा 
आपल्या प्रत्येकात काही ना काही विशेष गुण असतात त्यामुळे व्यक्ती विविध गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळवतो. ज्या व्यक्तींना आवड आहे त्यांनी संगीताचे ज्ञान घेतले पाहिजे, संगीताच्या माध्यमातूनच आपण परमेश्वराशी जोडले जाऊ शकतो, असा विश्वास संगीत विशारद मधुरा बेळे अाणि चारुशिला निपाणकर यांनी व्यक्त केला. महिलांमध्ये जागृती व्हावी, त्यांच्यातील सुप्तगुणांना वाव मिळवून देण्याचे काम जैन एकता मंचच्या माध्यमातून होत आहे. तेव्हा समाजातील इतरही स्रियांनी या मंचाशी जोडले जावे विकासाकडे वाटचाल करावी, असे त्यांनी सांगितले. 
 
जैन एकता मंच, नाशिकच्या वतीने भगवान महावीर जयंतीनिमित्त, अशोका इंजिनिअरििंग हॉल, उंटवाडी येथे भक्तिगीत स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास अध्यक्षा म्हणून नगरसेविका प्रियंका घाटे उपस्थित होत्या. जैन एकता मंचच्या अध्यक्षा सुरेखा कांकरिया यांनी मंचच्या वतीने महिलांसाठी घेण्यात येणाऱ्या विविध कार्याविषयी माहिती दिली. समाज्यातील विविध स्तरावरील स्रियांनी यायला हवे. त्यातूनच आपण सक्षम होऊ शकतो यासाठी सर्वांनी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. भगवान महावीर यांनी सत्य अहिंसेचा जो मार्ग दाखविलेला आहे तो संदेश सर्वांपर्यंत पोहाेचवण्याचे कार्य आपण केले पाहिजे, असे मत कांकरिया यांनी व्यक्त केले. स्पर्धेत ५० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी प्रथम क्रमांक दमयंती बरडिया, दुसरा क्रमांक योगिता ओस्तवाल, तिसरा क्रमांक समृद्धी लोढा यांनी पटकावला. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रतिभा लुणावत, संगीता चंडालिया, सपना बागमार, माधुरी नागसेठिया, वैशाली चोरडिया यांनी परिश्रम घेतले. यावेळी जैन एकता मंच्या संस्थापकीय अध्यक्षा मंगल घिया, अध्यक्षा सुरेखा कांकरिया, खजिनदार मनीषा बागरेचा, शर्मिला मुथा, पौर्णिमा सराफ, डॉ. लीना पिचा इतर उपस्थित होते. 

पुढील स्लाईडवर पाहा फोटोज आणि सविस्तर बातमी... 
बातम्या आणखी आहेत...