आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानसी शोरुमला आग, एक कोटींच्या साड्या जळून खाक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवाजीराेडवरील मानसी शाेरूमला मंगळवारी रात्री शाॅर्टसर्किटमुळे लागलेल्या अागीत झालेले हे नुकसान. - Divya Marathi
शिवाजीराेडवरील मानसी शाेरूमला मंगळवारी रात्री शाॅर्टसर्किटमुळे लागलेल्या अागीत झालेले हे नुकसान.
नाशिक- शिवाजीरोडवरील मानसी शोरुमला मंगळवारी रात्रीच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत दुकानातील सर्व साहित्य साड्या जळून खाक झाल्या. या आगीत तब्बल एक कोटींच्या साड्या जळून गेल्या आहे. एवढेच नव्हे तर सर्व फर्निचर इलेक्ट्रॉनिक साहित्यही जळून खाक झाले आहे. 
 
शिवाजीरोड येथील जिमखाना शॉपींग सेंटर येथील गाळा क्रमांक ३२ अाणि ३३ मध्ये मनोज अग्रवाल यांचे मानसी दुमजली मानसी हे साड्यांचे शोरुम होते. मंगळवारी रात्री एक वाजेनंतर या शोरुमला अचानक मोठी आग लागली. दरम्यान, आग लागल्याची माहिती समजताच अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी येऊन आग विझवण्याचे प्रयत्न केले. परंतु, आग मोठ्या प्रमाणात लागल्याने अवघ्या काही वेळातच संपूर्ण दुकान आगीत भस्मसात झाले. या आगीत दुकानातील सर्व साड्या जळून खाक झाल्या. 
 
तसेच फर्निचर इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यही जळून गेले. या आगीत तब्बल एक कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असल्याची माहिती मनोज अग्रवाल यांनी दिली अाहे. तर आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त हाेत आहे. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, सातपूर : गॅरेजला आग लागून लाखोंचे नुकसान...
बातम्या आणखी आहेत...