आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक शहर अखेर हागणदारीमुक्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्वच्छ शहरांच्या यादीत नाशिक १५२ क्रमांकावर फेकल्यानंतर ‘स्वच्छ सुंदर नाशिक’साठी धडपडणाऱ्या नाशिक महापालिकेसाठी बुधवारी (दि. २) दिलासादायक घाेषणा झाली असून, केंद्र शासनाच्या क्वालिटी काैन्सिल अाॅफ इंडिया या समितीने नाशिक शहराला हागणदारीमुक्त घाेषित केल्याची माहिती अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नाशिक महापालिकेसाठी ही बाब प्राेत्साहनपूर्वक ठरणार अाहे. 
केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर याेजनेत नाशिक पिछाडीवर गेले हाेते. मात्र, ही बाब गांभीर्याने घेत महापालिका अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी स्वच्छ शहरासाठी जाेरदार प्रयत्न सुरू केले हाेते. या अभियानाचा एक भाग म्हणून अाेला सुका कचरा विलगीकरणासाठी कार्यक्रम ठरवण्यात अाला. जुलैअखेर संपूर्ण शहर कचरा विलगीकरण करणारे महाराष्ट्रात पहिले अाणण्याचा प्रयत्न हाेता. त्यासाठी सामाजिक संस्थांच्या मदतीने कचरापेट्या देण्यापासून तर उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही करण्याचे निर्णय झाले. दुसरीकडे, केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवले जात अाहे. या अभियानांतर्गत शहरात उघड्यावर शाैच करणाऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात अाले. त्यानंतर शाैचालय नसलेल्यांकडे जागा असेल तर वैयक्तिक जेथे जागा नसेल तेथे सामूहिक वा गट शाैचालयाची याेजना राबविण्यात अाली. या अभियानांतर्गत महापालिकेने हजार २६४ लाभार्थ्यांना वैयक्तिक तर २५ सामुदायिक शाैचालयांचे बांधकाम केले. वैयक्तिक शाैचालय याेजनेत प्रतिलाभार्थी १२ हजारांचे अनुदान याप्रमाणे जवळपास अाठ लाख ८५ हजार इतकेअनुदान वाटप करण्यात अाले. दरम्यान, उघड्यावर शाैचास बसू नये याबाबत जनजागृतीसाठी बॅनर, फ्लेक्स, माहितीपत्रके लावण्यात अाली. दरम्यान, केंद्र शासनाच्या क्वालिटी काैन्सिल अाॅफ इंडिया या समितीने २८ २९ जुलै राेजी नाशिक शहरात अचानक पाहणी करून हागणदारीमुक्तीबाबतची खात्री केली. त्यानंतर वसई-विरार महापालिकेसह नाशिक शहरही हागणदारीमुक्त झाल्याचे घाेषित केल्याचे कृष्णा यांनी सांगितले. 

नाशिक स्वच्छ सुंदर करणार 
^नाशिक शहर हागणदारीमुक्त झाल्याची घाेषणा पालिकेचे प्राेत्साहन वाढवणारी अाहे. यापुढील काळात स्वच्छ शहरांच्या यादीत नाशिकला पुढे अाणण्याचा प्रयत्न अधिक जाेमाने हाेईल. स्वच्छ सुंदर नाशिक नक्कीच हाेणार. -अभिषेक कृष्णा, अायुक्त 

६१ स्पाॅट झाले हागणदारीमुक्त 
शहरात हागणदारीमुक्त याेजना राबवण्यापूर्वी महत्त्वाच्या रस्त्यांसह ६१ ठिकाणी उघड्यावर शाैचास नागरिक बसत असल्याचे अाढळले हाेते. या ठिकाणी गुड माॅर्निंग पथकाद्वारे लक्ष ठेवून अाराेग्य विभागाने दंडात्मक कारवाई सुरू केली. तसेच उघड्यावर शाैचास बसणाऱ्यांना वैयक्तिक गट शाैचालय याेजनेत सामावून घेतले. तसेच काही झाेपडपट्टी वसाहतीत फिरते शाैचालयांची वाहनेही उपलब्ध करून दिली. या सर्वाचा फायदा झाल्याचे अाराेग्यधिकारी डाॅ. सुनील बुकाने यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...