आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परवानगी नसल्यानेच बजावल्या नाेटिसा, महसुलासाठी पालिकेची ‘स्फाेटक’ भूमिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अाैरंगाबाद येथील एका मैदानात उभारण्यात अालेल्या फटाका स्टाॅलला लागलेल्या अागीत शनिवारी कराेडाे रुपयांचे नुकसान हाेतानाच शेकडाे चारचाकी दुचाकी वाहने जळून खाक झाली. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार या स्टाॅल्सची उभारणी करण्यात अालेली नसल्याचेही यानिमित्ताने प्रकर्षाने जाणवले.
या घटनेनंतर खडबडून जाग अालेल्या महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी शनिवारी दुपारी अचानक शहरातील फटाका स्टाॅल्सची पाहणी केली. या पाहणीतही विक्रेत्यांनी उभारणी केलेले स्टाॅल्स उच्च न्यायालयाच्या नियमांप्रमाणे नसल्याचे अाढळून अाले. एेन दिवाळीच्या दिवशीच पालिका अधिकाऱ्यांनी विक्रेत्यांना स्टाॅल्स नियमांप्रमाणे उभारावेत, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला. मात्र, एेनवेळी नियमांचे पालन करण्याचे अादेश एेकून घेण्यास विक्रेते तयार नसल्याचे अधिकारी अाणि विक्रेत्यांमध्ये चांगलीच ‘तू तू-मै मै’ झाली.

विविधकर विभागांची ५४२ स्टाॅल्सला परवानगी
फटाक्यांच्या गाळ्यांसाठीच्या लिलाव प्रक्रियेत महापालिकेच्या विविध कर विभागाने शहरातील ५४२ स्टाॅल्सला परवानगी दिली अाहे. ही परवानगी देताना फक्त कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावेत, असे वरकरणी विक्रेत्यांना सांगण्यात अाले. मुळात दिवाळी अगदी ताेंडावर येऊन ठेपल्याने बहुतांश विक्रेत्यांनी उच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या नियमांकडे दुर्लक्ष केले अाहे.
न्यायालयाच्या निर्देशानुसार मुख्य रस्त्यालगत रहिवासी वसाहतीलगत फटाक्यांची दुकाने लावू नयेत, अशा स्पष्ट सूचना दिल्या अाहेत. मात्र, याकडे बहुतांश ठिकाणी साफ दुर्लक्षच केले गेले असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत अाढळून अाले अाहे.

फटाक्यांचा धूर घातकच; रुग्णांनाही हाेताे त्रास
^फटाक्यांतून निघणारे घातक वायू दम्याच्या रुग्णांचा त्रास वाढवतात. नागरिकांनी फटाके फोडणे शक्यतो टाळावे किंवा दूरवर फोडण्याची काळजी घ्यावी. दम्याचा त्रास असणाऱ्यांनी दिवाळीत विशेष खबरदारी घ्यावी. -डाॅ. राजश्री पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी, इएसअाय

नियमांचे पालनच; पालिकेची भूमिका दुटप्पी
^स्टाॅलउ भारण्यापूर्वीच पालिका अग्निशामक दलाने प्रत्यक्ष पाहणी करून सूचना करणे अपेक्षित हाेते. मात्र, तसे करता दिवाळीच्या दिवशी स्टाॅलची पाहणी करून दडपण अाणले जात अाहेे. विविध कर विभाग अग्निशामक दल यांच्यातच ताळमेळ नाही. महिला विक्रेत्यांशीही उर्मट वर्तणूक केली जात अाहे. अाम्ही नियमांचे पालनच करीत अाहाेत. - प्रेमतायडे, जगदीश रायते, फटाका विक्रेते

पुढच्या वर्षी एक्स्प्लाेझिव्ह झाेन तयार करावा
^अाैरंगाबाद घटनेनंतर अाम्ही स्वत:च सुरक्षेत वाढ केली अाहे. डाेंगरे वसतिगृहाच्या मैदानावर वाहनांना मनाई केली अाहे. दिवाळी एक दिवसावर अाली असल्याने कारवाई टाळून पुढच्या वर्षी स्वतंत्र एक्स्प्लाेझिव्ह झाेन तयार करून तेथे दुकाने थाटण्यास परवानगी द्यावी. -जयप्रकाश जातेगावकर, अध्यक्ष, नाशिक फटका असाेसिएशन

स्टाॅल उभारणीपूर्वीच पाहणी करणे गरजेचे
^महापालिका एेनवेळेवर लिलाव घेते. त्यामुळे विविध प्रकारच्या परवानग्या मिळविण्यातच विक्रेत्यांचा वेळ जात असताे. प्रशासनाने नवरात्राेत्सवानंतर तत्काळ लिलाव करून उभारण्यात येणाऱ्या स्टाॅल्सची पूर्णत: पाहणी करायला हवी. त्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार विक्रेत्यांना स्टाॅल्स उभारता येतील. अाता अाैरंगाबाद येथील दुर्घटनेनंतर अधिकाऱ्यांना जाग अाली अाहे. अाम्ही चाेर नाहीत. लाखाे रुपयांचा महसूल भरून दुकाने थाटली अाहेत. -सुशांत मालवंडे, अध्यक्ष, नाशिक जिल्हा फटाका विक्री संघ

अवैध साठा दुकानांमुळे धाेका जास्त
^शहरातदरवर्षी माेठ्या प्रमाणात फटाक्यांचा अवैध साठा करण्यात येताे. तसेच नागरी वसाहतींसह बाजारपेठेतही दुकाने थाटली जातात. साठा करणारे विक्री करणाऱ्यांकडून एक्स्प्लाेझिव्ह कायद्याचे पालन केले जात नाही. तसेच त्यांना तांत्रिक अभ्यास नसल्याने जीवितहानी सारख्या घटना घडतात. अवैध साठा विक्री हाेऊ नये, यासाठी मी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली हाेती. न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे पाेलिस प्रशासनाने यापुढे तरी खबरदारी घेणे अपेक्षित अाहे. -चंद्रकांत लासुरे, याचिकाकर्ते

फटाक्यांचे दुष्परिणाम
स्फोटकांच्याज्वलनातून सल्फर डायऑक्साईडसारखे विषारी वायू बाहेर पडतात. धुरामुळे खोकला, दमा, श्वास कोंडणे हे विकार बळावतात. डोळ्यांची जळजळ, कर्करोग, डोकेदुखी हाेऊ शकते. कर्णकर्कश आवाजाने कायमचा किंवा तात्पुरता बहिरेपणा येऊ शकताे. डोकेदुखी, रक्तदाब, हृदयविकार, श्वसनमार्ग फुफ्फुसाचे विकारही.

अनेक विक्रेत्यांनी न्यायालयीन अादेशाला केराची टाेपली दाखवत अशाप्रकारे दुकाने थाटली अाहेत. अनेक ठिकाणी वायरी उघड्यावर लाेंबलेल्या, सुरक्षित अंतर नाही, अत्यावश्यक सुरक्षिततेची साधने नाहीत, असे चित्र दिसले. तर काही ठिकाणी रस्त्याच्या कडेलाच नियमबाह्यपणे फटाकेविक्रीची दुकाने थाटली असल्याचेही दिसले.

१२ हजार लिटरच्या बंबाएेवजी ५०० लिटर पाण्याचे वाहन
महापालिका प्रशासनाने फटाका विक्रेत्यांकडून सुरक्षिततेच्या नावाखाली महसुल गाेळा केला अाहे. यात नियमाप्रमाणे प्रत्येक स्टाॅल धारकाकडून अग्निशामक बंब उभा करण्यासाठी पैसे घेण्यात अाले अाहेत. एकट्या डाेंगरे वस्तीगृह येथे ३० गाळे असून इदगाह मैदानावर ४० गाळे अाहेत. या दाेन्ही ठिकाणांवरील गाळ्यांच्या सुरक्षिततेसाठी फक्त ५०० लिटर पाण्याची क्षमता असलेले दाेन वाहने फक्त नावापुरतीच उभी करण्यात अालेली अाहे. हे वाहन उभे करण्यासाठी दरराेज पाचशे रुपयांची अाकारणी प्रत्येकी गाळ्याधारकांकडून करण्यात अाली अाहे. या माध्यमातून महापालिकेला लाखाे रुपयांचा महसुल प्राप्त झाला अाहे. या ठिकाणी १२ हजार लिटर क्षमतेचा बंब उभा असणे अत्यावश्यक असताना फक्त ५०० लिटरची क्षमता असलेले छाेटे वाहन उभे करण्यात अाले अाहेत.

‘तुम्हीच परवानगी दिली’
अग्नि शामक विभागप्रमुख अनिल महाजन यांनी विक्रेत्यांना सायंकाळपर्यंत स्टाॅल काढून घ्यावेत नियमाप्रमाणे उभारणी करावी अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला. यानंतर विक्रेत्यांचाही संयम सुटला त्यांनी अधिकाऱ्यांनाच धारेवर धरत ‘तुम्हीच लिलावाची जाहिरात दिली हाेती ना? अाम्ही नियमाप्रमाणे लिलावात भाग घेऊन लाखाे रुपयांचा महसूल जमा करून स्टाॅल्सची उभारणी केली अाहे. लिलाव झाल्यानंतर स्टाॅल कशाप्रकारे उभारले अाहेत, हे बघण्यासाठी का अाले नाही? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करून अधिकाऱ्यांनाच जाब विचारला.

काय अाढळले ‘डी. बी.
स्टार’च्या पाहणीत...
{डाेंगरे वसतिगृह मैदानावरील दुकानांदरम्यान केवळ दाेन फूट जागा साेडली. प्रत्यक्षात दहा फुटांपर्यंत जागा साेडणे गरजेचे
{ दुकानात विद्युत दिवे वा तारा लाेंबकळणाऱ्या स्थितीत नसाव्यात. मात्र, बहुतांश दुकानांत याउलट चित्र अाहे.
{ अाग प्रतिबंधासाठी सीसफायर पाण्याचे ड्रम अाढळले.
{ तातडीने अाग विझविण्यासाठी वाळूचा वापर करणे गरजेचे असते. प्रत्यक्षात बादल्यांमध्ये वाळूएेवजी कच साचविल्याचे अाढळून अाले.
{ परिसरात अग्निशमन बंब असणे गरजेचेे. प्रत्यक्षात अतिशय छाेटा बंब उभा अाहे. त्यातून दुकानांची अाग नियंत्रित हाेऊच शकत नाही.
या ठिकाणांवर थाटली दुकाने
पालिकेनेपरवानगी देताना उच्च न्यायालयाच्या अादेशाकडे दुर्लक्ष केल्याने पंचवटीतील हनुमानवाडी, सिडकाेतील माेरवाडी राणाप्रताप चाैक, अंबड गाव तसेच नाशिकराेड परिसरातील बिटकाे, सातपूर विभागातील श्रमिकनगर बसस्टाॅप, शिवाजीनगर अादी ठिकाणी रस्त्याच्या कडेला नागरी वसाहतीलगत फटाक्यांची दुकाने उभारली अाहेत. मुख्य म्हणजे, दुकानांतील अंतरही पुरेसे नाही.
बातम्या आणखी आहेत...