आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जन मिरवणुकीत ढाेल-ताशांचाच यंदा डंका; दहा पथके गाजवणार चाैक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गणेशाेत्सव मिरवणुकीत यंदा ध्वनी यंत्रणेच्या मर्यादांचे नियम काटेकाेरपणे पाळले जाणार असल्याचे सांगितले जात असल्याने अनेक मंडळांनी ध्वनीक्षेपकांएेवजी ढाेल ताशांना विशेषत: नाशिक ढाेलला प्राधान्य दिले अाहे. राज्यात सर्वत्र अशीच परिस्थिती असल्याने यंदा सर्वत्र नाशिक ढाेलचाच डंका वाजणार अाहे. नाशिकच्या मिरवणुकीत यंदा दहापेक्षा अधिक ढाेलपथक सहभागी हाेणार अाहेत. महत्त्वाच्या चाैकांमध्ये या ढाेलपथकांचाच बाेलबाला यंदा बघायला मिळणार अाहे. 

ढाेल, ताशा अाणि झांज यांची लयबध्द सांगड घालत विशिष्ट तालाने वादन करण्याची नाशिक ढाेलची खासियत अाहे. मनाेजकुमारचा गाेरा अाैर काला तसेच सनी देअाेलचा नरसिंहा या चित्रपटांनी नाशिक ढाेलला भारतभर अाेळख मिळवून दिली. 

त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये नाशिक ढाेलचे संगीत एेकायला मिळाले. हा ढाेल नाशिकच्या मिरवणुकीपुरताच मर्यादित राहता काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत त्याला मागणी वाढली. इतकेच नाही तर परदेशातही नाशिकचे ढाेलपथक अापली कलाकारी पेश करुन अाली अाहे. नाशिक ढाेलचा हा लाैकीक बघता मुंबईतही अनेक ढाेलपथकांनी ‘नाशिक ढाेल’च्या नावाने अापला व्यवसाय वाढविला अाहे. अाता तर भारतभर नाशिक ढाेल नावानेच ढाेलची मागणी येते. त्यातच यंदा ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी कडक कारवाई करण्याचा इशारा पाेलिसांनी दिला असल्याने ध्वनीक्षेपकांएेवजी ढाेलला मागणी वाढली अाहे. नियमाप्रमाणे उत्सव काळात ८५ डेसिबलपर्यंत ध्वनी चालू शकताे. मात्र त्यापेक्षा माेठा अावाज अाल्यास कायद्याचा भंग हाेताे. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी ढाेलचा वापर यंदा वाढणार अाहे. यंदाच्या मिरवणुकीत सुमारे १० ढाेल पथके अापली कला सादर करणार असून त्यात महिलांचा सहभाग लक्षणीय असणार अाहे. 
 
दाेनते तीन महिन्यांपासून सराव 
पारंपरिक ढाेलताशा पथकांमुळे यंदा निश्चितच मिरवणुकीची मजा वाढणार अाहे. प्रत्येक पथकाने सुमारे दाेन ते तीन महिने विसर्जन मिरवणुकीतील वादनाचा सराव केला अाहे. महिलांचे पथकही पूर्ण ताकदीनिशी यंदाच्या मिरवणुकीत उतरणार अाहेत. ही कला बघण्यासाठी नाशिककरांनी माेठ्या संख्येने यावे. -कुणालभाेसले, शिवसाम्राज्य ढाेल पथक 

मिरवणूक लवकर सुरू हाेणार असल्याने ढाेलची मजा वाढणार 
मिरवणुकीसाठी ढाेल पथकांमधील कलावंत सुमारे दाेन महिने अाधीपासून सराव करतात. मात्र मिरवणुकीत त्यांना सादरीकरण रात्री सात वा अाठनंतर करावे लागते. महत्त्वाचे म्हणजे मिरवणुकीत महिला ढाेल पथकांचाही समावेश असताे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अापली कला सादर करणाऱ्या या रणरागिणींचा उत्साह वाढविण्यासाठी मिरवणूक वेळेत सुरू हाेणे अाणि त्यांना वेळेत संधी दिली जाणे गरजेचे असते. प्रत्यक्षात रात्रीच्या वेळी कला सादर करण्याची संधी दिली जात असल्यामुळे त्यांना रात्री उशिरा घरी जावे लागते. यामुळे ढाेलपथकातील महिलांचा सहभागही कमी हाेऊ शकताे. या पार्श्वभूमीवर गणपतीची मिरवणूक दुपारी १२ वाजताच सुरू करण्याचे यंदाचे नियाेजन अाहे. 

यु ट्यूबवरही नाशिक ढाेलचा दणका
गणेशाेत्सवाची मिरवणूक म्हटली की त्यात नाशिक ढाेल हवाच अशी धारणा संपूर्ण महाराष्ट्रात झाली अाहे. म्हणूनच गणेशाेत्सव काळात नाशिक ढाेलचा डंका संपूर्ण राज्यात वाजत अाहे. इतकेच नाही तर यु ट्यूबसारख्या साेशल मीडियावरही नाशिक ढाेलचे शेकडाे व्हिडीअाे अपलाेड झाले अाहेत. यु ट्यूबच्या सर्च बाॅक्समध्ये ‘नाशिक ढाेल’ असे टाईप केल्यास असंख्य व्हिडिअाे क्लिप्स बघायला मिळतात. त्यात सलमान खान, साेनाक्षी सिन्हा यांसारखे बडे चित्रपट कलावंत नाशिक ढाेलवर थिरकतानाच्याही क्लिप्स अाहेत. या ढाेलवर विविध चित्रपट कलावंत ठेका धरतानाचे व्हिडीअाे देखील यात बघायला मिळतात. यु ट्यूबवर संपूर्ण महाराष्ट्रातील ढाेल पथकांची कलाकारी दाखविण्यात अाली असली तरी त्यात उमटून दिसतात ते नाशिकचे कलावंत. पारंपारिक ढाेल पथकांबराेबरच अाधुनिक पिढीने तयार केलेले ग्रुप्स, त्यांचे एकसारखे पेहराव, पथकांमधील तरुणींचा सहभाग अाणि मंत्रमुग्ध करणारा ताल या बाबी नाशिक ढाेलची खासियत अाहे. 
 
डीजे लावणाऱ्या मंडळ पदाधिकाऱ्यांवर अाता गुन्हे
गणेशविसर्जन मिरवणूकीत डीजे लावणाऱ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. गत वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनीप्रदूषण करणाऱ्या बड्या राजकीय पदाधिकारी असलेल्या ‘भाऊ-नानां’च्या मंडळांसह ३७ गणेश मंडळांवर ध्वनीप्रदूषणाचे गुन्हे दाखल झाल्याने या मंडळाचे कार्यकर्ते पासपोर्ट, शासकीय नोकरीपासून वंचित असल्याने गुन्हे दाखल असलेल्या कार्यकर्त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 
 
२०१६ मध्ये विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांनी ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याने शहर परिसरात राजकीय नेते संस्थापक असलेल्या गणेश मंडळासह इतर ३७ गणेश मंडळांवर गुन्हे दाखल झाले होते. डीजेचा आवाज सामान्य ६५ डेसिबल पेक्षाही अधिक ठेवल्याचे नॉईज मिटर मापक यंत्राद्वारे निदर्शनास आले होते. विषेश म्हणजे शहरातील एका जबाबदार नागरीकाने मिरवणूकीत डीजे वापरल्याने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 
 
न्यायालयात खटला सुरू : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनीक्षेपकाच्या आवाजाचे उल्लंघन करणाऱ्या मंडळाच्या पदाधिकारी, डीजे मालक यांच्या विरोधात न्यायालयात खटला सुरु आहे. तसेच एका नागरिकाने याचिका दाखल केली आहे. या दोन्ही खटल्यात गुन्हा सिद्ध् झाल्यास पाच वर्ष कैद, लाख रुपये दंडाची शिक्षेची तरतूद आहे. 

गुन्हे दाखल असल्याने अडचणी : भा.दं. वि. १८८, २९०, २९१, ३४ सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १३१, १३४, १३५, १४०, पर्यावरण संरक्षणक कायदा कलम सह ध्वनीप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याचे गुन्हे दाखल होतात. शासकीय, निमशासकी, कामांसाठी लागणारे चारित्र्य दाखला देतांना या गुन्ह्यांचा दाखल्यात उल्लेख केला जातो. यामुळे नोकरी, पासपोर्ट मिळवतांना अर्जदाराला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत अाहे. 
बातम्या आणखी आहेत...