आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवार पाडण्याची पालकमंत्र्यांना धमकी, आयारामांच्या उमेदवारी चर्चेने इच्छुकांचा घेराव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नाशिक -उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस येऊनदेखील भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर हाेत नसल्याने इच्छुकांनी संतप्त होऊन थेट पालकमंत्री गिरीश महाजन यांनाच घेराव घालत अायारामांना उमेदवारी दिल्यास चारही उमेदवार पाडून टाकू, अशी धमकीही दिली. गुरुवारी पालकमंत्र्यांच्या लवाटेनगर येथील निवासस्थानी हा प्रकार घडला. प्रभाग मधील इच्छुक अाक्रमक झाल्याचे बघून पालकमंत्र्यांनी सावध पवित्रा घेत त्यांची समजूत घालून अखेर वाद मिटविला. 
कार्यकर्त्यांमध्ये नाराजी, यादीएेवजी फॉर्मच देणार 
- निष्ठावंत असलेतरी त्यांची निवडून येण्याची क्षमताही बघणे गरजेचे अाहे. भाजकडे इच्छुकांची गर्दी जास्त असून बहुमताच्या आकड्यासाठी सर्व पर्याय तपासले जात अाहेत. अद्याप कुठलेही नावे निश्चित नसून काही जागांवर एकमत हाेत नसल्याने यादी जाहीर केली जाणार नाही. शुक्रवारी दुपारी १२ वाजेपासून उमेदवारांना बाेलावून एबी फाॅर्म वितरीत केले जातील. कार्यकर्त्यांत नाराजी स्वाभाविक असून त्यांनी घेराव वगैरे घातला नाही. -गिरीश महाजन, पालकमंत्री