आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यमान नगरसेवकांसह 70 जणांचे अर्ज दाखल, पक्षांच्या याद्या जाहीर झाल्यावर येणार भरती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सुरू झाल्याच्या पाचव्या दिवशी, बुधवारी (दि. १) तब्बल ७० जणांनी अर्ज दाखल केले. त्यात अाठ विद्यमान नगरसेवकांचा समावेश असून काही माजी नगरसेवकांनीही अर्ज दाखल केले अाहेत. दरम्यान, गुरुवारी (दि. २) राजकीय पक्षांची उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर अर्ज दाखल करण्यास भरती येणार अाहे. 
 
महापालिका निवडणुकीसाठी २७ जानेवारीपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी अमावास्येची अडचण असल्यामुळे अर्ज दाखल हाेऊ शकले नाही. निवडणूक यंत्रणेच्या प्रात्यक्षिकामुळे ‘हेमंत बिऱ्हाडे’ नामक अस्तित्वात नसलेल्या व्यक्तीचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यानंतरही तीन दिवसांत केवळ ४० उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यातल्या त्यात मंगळवारी ३० उमेदवारी अर्ज दाखल झाले हाेते. सर्वच राजकीय पक्ष अद्याप अापले उमेदवार शकले नसल्याचे प्रमुख कारण यामागे असल्याचे स्पष्टपणे दिसत अाहे. 
 
दरम्यान, बुधवारी प्रमुख राजकीय पक्षांच्या याद्या जाहीर हाेतील त्यानंतर दुपारपर्यंत अर्ज दाखल करण्याची संख्या वाढेल अशी अपेक्षा हाेती. प्रत्यक्षात, प्रमुख राजकीय पक्षांच्या याद्यांचा घाेळ सायंकाळपर्यंत सुरूच हाेता. त्यामुळे दिवसभरात ७० उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यात लक्ष्मण जायभावे, वत्सला खैरे, सचिन मराठे, शिवाजी गांगुर्डे, अशाेक सातभाई, पवन पवार, काेमल मेहराेलिया, रमेश धाेंगडे यांचा समावेश अाहे. 
 
महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया वेग धरू लागलेली असतानाच इच्छुक उमेदवारांनी अशी डमी मतदानयंत्रे अाणली असून, त्यांच्या माध्यमातून प्रचारादरम्यान मतदारांना इलेक्ट्राॅनिक मतदान प्रक्रिया समजावून सांगितली जाणार अाहे. 
 
एबी फाॅर्मविनाच रिंगणात 
शिवसेना,भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षांनी अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नाही. मात्र, अापली उमेदवारी निश्चित मानून अाठ नगरसेवकांनी एबी फाॅर्मविनाच रिंगणात उडी घेतली अाहे. ही बाब पालिकेच्या वर्तुळात चर्चिली जात हाेती. 
 
थेट निवडणूक अधिकाऱ्याकडेच एबी फाॅर्म 
राजकीयपक्षांचा अधिकृत उमेदवाराची अाेळख सांगणारा महत्त्वाचा एबी फाॅर्म काेणाला मिळताे याबाबत उत्सुकता शिगेला गेली अाहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे यापैकी एकाही पक्षाची यादी जाहीर झाली नसल्यामुळे एबी फाॅर्म काेणाला मिळताे त्यावर संभाव्य बंडखाेरीचे पीक किती उगवते हे अवलंबून अाहे.
 
या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून खासकरून शिवसेना भाजपकडून इच्छुकांची वाढती संख्या लक्षात घेत थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडेच एबी फाॅर्म दिला जाण्याची शक्यता अाहे.
बातम्या आणखी आहेत...