आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उड्डाणपुलाच्या वैभवाला अवकळा; खासगी पार्किंगसह अतिक्रमणांचा विळखा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहराचा विकास हाेतानाच वाहतुकीची काेंडी टाळण्यासाठी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नामुळे शहरातील गरवारे फाटा ते अाडगांव असा सुमारे ६.१ कि.मी.चा उड्डाणपूल उभारण्यात अाला अाहे. या पुलामुळे मुंबईहून नाशिकमार्गे येणारी जाणारी वाहने शहरात येता थेट पुलावरून जात असल्याने शहरातील अंतर्गत रहदारीचा त्याचा माेठा फायदा झाला अाहे. शहराचा विकास साधण्यासाठी केलेला हा प्रयत्न मात्र नाशिककरांसाठी डाेकेदुखी ठरू लागला अाहे. पुलाच्या खाली असलेल्या माेकळ्या जागांचा वापर भिकाऱ्यांनी निवारा म्हणून करण्यास सुरूवात केली अाहे. विशेष म्हणजे हे सर्व भिकारी उड्डाणपूल तयार झाल्यानंतर परराज्यातून येवून स्थायीक झाल्याचे बाेलले जात अाहे. 
 
हाॅटेल चचालकांकडूनही केला जाताे पार्किंग म्हणून वापर : मुंबईनाकाते पाथर्डी फाटा द्वारका ते अाडगाव या परिसरात काही ठिकाणी पुलाच्या खाली असलेल्या माेकळ्या जागांचा वापर हाॅटेल्स व्यावसायिकांकडून पार्किंग म्हणून केला जात अाहे. राज्य महामार्गालगतचे बिअर बार वाइन शाॅप बंद असल्याने पुलाखालील अनधिकृत पार्किंगच्या जागेचा वापर मद्द प्राशन करण्यासाठी केला जात अाहे. पार्किंगमध्ये मद्यप्राशन केल्यानंतर समाेरच असलेल्या हाॅटेल्समध्ये जेवणाची व्यवस्था हाेते. यासाठी काही हाॅटेल्सचालकांनी खास खास सासगी सुरक्षारक्षकांची नेमणूक केली अाहे. या सर्व बाबींकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह महापालिका पाेलिस प्रशासनाचे दुर्लक्ष अाहे. 

मुंबई-पुण्याच्या धर्तीवर वापर शक्य 
मुंबई पुण्याला उड्डाणपुलाखालील माेकळ्या जागेचा वापर तेथील प्रशासनाने एस.टी. बसेस पार्किंगसाठी केला अाहे. त्यामुळे एस. टी. बसस्थानकाजवळ पार्क हाेतानाच डिझेलसह वेळेचीही माेठी बचत हाेते. याच धर्तीवर तत्कालीन विभाग नियंत्रक देशमुख यांनी नाशिकराेड येथील उड्डाणपुलाचा वापर बसेसच्या पार्किंगसाठी करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र अद्यापही ताे धूळखात पडून अाहे. 

नाशिकराेड उड्डाणपुलालाही विळखा 
नाशिकराेड येथील उड्डाणपूलही अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला अाहे. दत्तमंदिर ते सिन्नर फाटा या परिसरातील या पुलाखाली भाजीविक्रेत्यांपासून, रसवंती, गॅरेज अशा विविध व्यावसायिकांनी व्यवसाय थाटले अाहेत. उड्डाणपुलामुळे रहदारीचा प्रश्न सुटण्यास मदत हाेत असली तरी, ‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक’ या संकल्पनेला मात्र छेद दिला जातो आहे. 

पाेलिस प्रशासनाच्या सहकार्याची अावश्यकता 
^उड्डाणपुलाखाली काही लाेकांनी वास्तव्य करून सुशाेभीकरणाचे नुकसान केल्याची माहिती अामच्या गस्ती पथकाने दिली अाहे. तसेच, पुलाखालील माेकळ्या जागेवर वाहनेदेखील पार्क केली जातात. सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अाम्ही पाेलिसांशी याविषयी पत्रव्यवहार केला अाहे. तसेच, पाेलिसांच्या सांगण्यावरून वाहने उभी करू नयेत, असे प्रबाेधनात्मक फलकही लावले अाहेत. पार्क वाहनांचे फाेटाेही पाेलिसांना दिले अाहेेत. मात्र पाेलिसांकडून सहकार्य मिळत नाही. -प्रशांत खाेडसकर, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 

प्रत्येक सिग्नलवर वाहनधारकांना त्रास 
पुलाखाली वास्तव्य करणाऱ्यांपैकीच काही महिला पुरुष लहान बालकांना कडेवर घेऊन शहरातील प्रत्येक सिग्नलवर भीक मागण्याचे काम करतात. अत्यंत भावनिक पद्धतीने राेजच भीक मागण्याच्या या प्रकाराला वाहनधारक कमालीचे त्रासले अाहेत. मात्र, यावर यंत्रणेकडून काेणत्याही प्रकारची उपाययाेजना केली जात नाही. 

सुशाेभीकरण तरी वाचवावे 
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून परवानगी घेतल्यानंतर एल अॅण्ड टी कंपनीने पुलाच्या खालील भागाचे सुशाेभीकरण केले अाहे. मात्र भिकाऱ्यांसह विविध खेळणी फुले विकणाऱ्यांनी या पुलाच्या खालील भागावर ताबा मिळविल्याने सुशाेभित केलेला परिसर विद्रुप हाेऊ लागला अाहे. अातातरी संबंधित यंत्रणेने सुशाेभीकरण वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज अाहे. 

सुशाेभीकरणाचे सर्वत्र विद्रुपीकरण 
पुलाखाली असलेल्या माेकळ्या जागेत सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) लाखाे रुपये खर्चून सुशाेभीकरण करण्यात अाले अाहे. त्यासाठी ठिकठिकाणी लाॅन्ससह शाेभेच्या झाडांचा समावेश अाहे. या सुशाेभीकरणामुळे पुलाखालून जाणाऱ्या वाहनधारकांना परिसराचे प्रसन्न करणारे दृश्य बघण्यास मिळत हाेते. मात्र, शहरात दाखल झालेल्या भिकाऱ्यांनी चक्क पुलालाच निवारा शेड बनवून सुशाेभित केलेल्या जागेवरच बस्तान बसविले अाहे. इतकेच नव्हे तर, त्यांनी या जागेत लावण्यात अालेली राेेपटेदेखील ताेडलेली अाहेत. त्याच ठिकाणी त्यांचे साहित्य कपडे पडलेले असल्याने शहरात प्रवेश करणाऱ्यांना नाशिकचे अाेंगळवाणे रूप बघावे लागत अाहे. 

सिंगल पिलरवर उभारलेला पूल 
स्टारटेड तंत्रज्ञान पद्धतीचा देशातील पहिला उड्डाणपूल नाशिकमध्ये उभारण्यात आला. सिंगल पिलरवर आधारलेला चार पदरी पूल हे या पुलाचे खास वैशिष्ट्य अाहे. अशा या उड्डाणपुलामुळे नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा राेवला गेला अाहे. पुलाखालील आडव्या दांड्या (स्टारटेड डिझाइन) या तंत्रज्ञानामुळे वजन पेलण्याची क्षमता वाढते. 
किशाेर बाेर्डे 
अतिरिक्त अायुक्त, महापालिका 
 
नाशिकच्या वैभवात भर टाकणारा ६.१ किलोमीटर लांबीचा पूल सध्या अतिक्रमणांच्या विळख्यात सापडला अाहे. अनेक ठिकाणी या पुलाचा वापर भिकारी निवारा म्हणून करत अाहेत. त्यामुळे एल अँड टी कंपनीने पुलाच्या सुशाेभीकरणासाठी केलेला लाखाे रुपयांचा खर्च वाया गेला अाहे. तसेच, महामार्गालगतच्या हाॅटेलवाल्यांकडून पुलाखालील जागेचा वापर ग्राहकांची वाहने पार्क करण्यासाठी केला जात अाहे. या पुलाच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका पाेलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच पर्यटकांसह भाविकांना या वैभवाचे अाेंगळवाणे दर्शन घडत अाहे. यंत्रणांच्या या हलगर्जीपणावर डी. बी. स्टारचा हा प्रकाशझाेत... 
 
राष्ट्रीय महामार्ग, महापालिका पोलिसांचे दुर्लक्ष 
{ उड्डाणपुलाखालील माेकळ्या जागेचा अनेक ठिकाणी दुरुपयाेग हाेत अाहे. यावर नियंत्रण ठेवण्याचे काम महापालिकेचे की महामार्ग प्राधिकरणाचे? 
-मुळात उड्डाणपुलाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडूनच केले जाते. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम त्यांचेच अाहे. तरीही त्या जागेचा काही गैरवापर हाेत असल्यास पाेलिस प्रशासनाशी पत्रव्यवहार करून त्यावर अाम्ही मार्ग काढू. 
{उड्डाणपुलाखालील माेकळ्या जागेत वास्तव्य करणाऱ्या भिकाऱ्यांकडून सुशाेभीकरणाचे विद्रुपीकरण केले जात अाहे. हे टाळण्यासाठी अापल्या विभागामार्फत काेणते प्रयत्न केले जात अाहेत? 
-भिकाऱ्यांना हटविण्यासाठी अाम्ही अनेकवेळा प्रयत्न केले अाहेत. यापुढे पाेलिसांशी पत्रव्यवहार करून त्यांना लवकरच बेगर हाऊसमध्ये दाखल करण्याची कारवाई केली जाईल. 
{पुलाखालील माेकळ्या जागेत वाहने पार्किंग केली जातात. महापालिकेने त्यासाठी परवानगी दिली अाहे का? 
-नाही, अशा प्रकारची काेणतीही परवानगी देण्यात अालेली नाही. उड्डाणपुलासह रत्याकडेला बेशिस्त पार्क केल्या जाणाऱ्या वाहनांवर महापालिकाही अाता कारवाई करेल. 
बातम्या आणखी आहेत...