आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात कमाल तपमान 40, तर किमान 21.8 अंश; निळेशार थंड, जल खेळू उदंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी स्वा. सावरकर जलतरण तलावावर बालकांनी अशी धमाल आहे. - Divya Marathi
रविवारी स्वा. सावरकर जलतरण तलावावर बालकांनी अशी धमाल आहे.
नाशिकरोड - शहरात उन्हाची तीव्रता कायम असून कमाल आणि किमान तपमान कायम असले तरी किमान तपमानात वाढ होत आहे. रविवारी किमान तपमानाचा पारा २१.८ अंश सेल्सिअसपर्यंत गेला होता. त्यामुळे शहरवासीयांना रात्रीच्या उकाड्याचा सामना करावा लागत आहे. 
 
राज्यात सध्या सर्वत्र उन्हाचा तडाखा वाढला असल्याने नागरिकांना चटका सहन करावा लागत आहे. रात्रीच्या उकाड्यामुळे शहरवासीयांच्या दिनचर्येमध्ये बदल झालेला दिसून येत आहे. रात्री १२ ते वाजेपर्यंत जागरण करून सकाळी उशिरा दैनंदिनीला सुरुवात होते. सध्या दिवस मोठा होत असल्याने सकाळी सहा वाजेपासून सूर्योदय होत असून रात्रीही ६.३० वाजेदरम्यान सूर्यास्त होत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे शहरातील डांबरी रस्ते तापत असल्याने उन्हासोबत डांबराचा चटकाही सहन करावा लागत आहे. आठवडाभर उन्हाची तीव्रता कायम राहाणार असल्याने नागरिकांना सहन करावा लागत आहे. 

गेल्या काही दिवसांपासून शहराचे तपमान ४० अंशांवर गेलेले अाहे. यामुळे शहरवासीयांना उकाड्याचा सामना करावा लागत अाहे. त्यातच शाळांना उन्हाळी सुटी लागल्याने उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी जलतरण तलावावर बालकांनी माेर्चा वळवला अाहे. रविवारी स्वा. सावरकर जलतरण तलावावर बालकांनी अशी धमाल केली. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, किमान तपमानात हाेत अाहे वाढ...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...