आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या गणेश बानाईतकर यांच्या माती परीक्षणाची जागतिक नोंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अवघ्या दहा सेकंदांत विशेषज्ञ समितीसमाेर मातीचे परीक्षण करून तेथील जमिनीत किती सकारात्मक ऊर्जा अाहे किती नकारात्मक अाहे, तसेच ही जमीन निवासायाेग्य, व्यवसायायाेग्य किंवा शेतीयाेग्य अाहे की नाही, हे परीक्षणात सिद्ध करून देणाऱ्या नाशिकच्या गणेश बानाईतकर यांची नाेंद गिनीज बुक अाॅफ वर्ल्ड रेकाॅर्डने घेतली असून, एशिया बुक अाॅफ रेकाॅर्ड अाणि इंडिया बुक अाॅफ रेकाॅर्ड नाेंदविण्यात अाले अाहे. जागतिक विक्रमाची मानाची ट्राॅफी अाणि प्रमाणपत्र त्यांना बहाल झाले असून, नाशिकचे नाव पुन्हा एकदा वेगळ्या विक्रमाकरिता जागतिक पातळीवर पाेहाेचले अाहे. 
 
नाशिकमध्ये हिरावाडी परिसरात राहणाऱ्या गणेश बानाईतकर यांनी इंदूरमधील प्रसिद्ध डाॅ. राजेंद्र जैन यांच्याकडे वास्तूमध्ये स्वरशास्त्र अाणि डाउजिंगचे प्रशिक्षण घेतले अाहे. जानेवारीच्या शेवटच्या अाठवड्यात कर्नाटकमधील म्हैसूरपासून ७० किलाेमीटर अंतरावर असलेल्या कनकगिरी येथे वास्तुशास्त्राशी संबंधित देशातील निवडक ५७ जणांना या उपक्रमाकरिता निवडण्यात अाले हाेते, ज्यात महाराष्ट्रातील पाच जणांचा समावेश हाेता. नाशिकमधून बानाईतकर हे एकटेच सहभागी झालेले हाेते. विशेषज्ञ समितीसमाेर केलेल्या या परीक्षणात जमिनीत सकारात्मक ऊर्जा माेठ्या प्रमाणावर असल्याचा निष्कर्ष बानाईतकर यांनी स्वरशास्त्र डाउजिंग यांच्या माध्यमातून काढला हाेता. हाच निष्कर्ष तज्ज्ञ समितीकडूनही काढला गेला हाेता. बानाईतकर यांनी १० सेकंदांच्या अल्प विक्रमी वेळात हा निष्कर्ष काढल्याने त्यांची नाेंद जागतिक विक्रमाकरिता घेतली गेली त्यांना सन्मानितही केले गेले. 
 
स्वरशास्त्र कसे काम करते ? 
मानवी शरीर ज्या प्राणवायूवर चालते ताे घेण्यासाठी नाकाच्या उजव्या डाव्या नाकपुडीतून श्वासोच्छ्वासाची अविरत प्रक्रिया सुरू असते. दर तास २२ सेकंदांनी ही क्रिया उजव्या-डाव्या नाकपुडीतून क्रमाक्रमाने हाेत असते. उजव्या नाकपुडीतून सूर्य स्वर, तर डाव्यातून चंद्र स्वर असतात. दिवसातून एकवेळ अशी असते की, दाेन्ही नाकपुडीतून श्वासाेच्छ्वास सुरू हाेताे त्यावेळी सुशुम्नानाडी स्वर सुरू हाेताे. स्वरशास्त्रातच पंचतत्त्वेही येतात. यातून जमिनीच्या खाली कुठला धातू अाहे? काही मानवी सांगडे अाहेत का? जमीन निवासायाेग्य अाहे का? याची उत्तरे याचे जाणकार शाेधत असतात. 
 
असा पहिलाच प्रयाेग 
वास्तु शास्त्रानुसार मातीपरीक्षणात अशाप्रकारचा हा पहिलाच एकत्रित कार्यक्रम अायाेजित करण्यात अाला हाेता, ज्यात या तिन्ही विक्रमांची नाेंद घेण्यात अाली. एशिया बुक अाॅफ वर्ल्ड रेकाॅर्ड अाणि इंडिया बुक अाॅफ रेकाॅर्डने दुसऱ्याच िदवशी सन्मानित केले असून, गिनीज बुकमध्ये नोंद घेतली गेली असून, त्याचे प्रमाणपत्र येत्या दाेन महिन्यांत मिळणार अाहे.
-गणेश बानाईतकर, नाशिक 
 
काय अाहे डाउजिंग 
डाउजिंग ही भारतीय ऋषीमुनींनी शाेधलेली, पण कालांतराने अापल्याकडे तिचा विसर पडून विदेशात ती विकसित झाली. शरीरातील अवचेतन मन अाणि पृथ्वीची विद्युत चुंबकीय शक्ती यांचा मिलाफ करून जमिनीतील ऊर्जेचे परीक्षण यात करता येते. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...