आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नाशिक पदवीधर’साठी फेब्रुवारीला मतदान, सहा फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली / नाशिक - नाशिक पदवीधर मतदारसंघासह राज्यातील विधान परिषदेच्या दोन पदवीधर आणि तीन शिक्षक मतदारसंघांतील निवडणुकांचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केला. यात नागपूर, कोकण या दोन शिक्षक मतदारसंघांंचा, तर अमरावती नाशिक या पदवीधर मतदारसंघांचा समावेश आहे. या पाचही जागांसाठी फेब्रुवारीला मतदान होणार असून, फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. 
 
येत्या १० जानेवारीला निवडणुकीची अधिसूचना निघेल. उमेदवारी अर्ज १० ते १७ जानेवारीपर्यंत स्वीकारले जातील. १८ जानेवारीला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. २० जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. फेब्रुवारीला सकाळी ते या वेळेत मतदान होईल. फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जातील. राज्यात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सुधीर तांबे, अमरावती पदवीधर मतदारसंघातील आमदार विद्यमान राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातील आमदार विक्रम काळे, कोकण शिक्षक मतदारसंघातील आमदार रामनाथ मोते आणि नागपूर शिक्षक मतदारसंघाचे आमदार नागो गाणार यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कालावधी डिसेंबर रोजी संपला आहे. मात्र, या मतदारसंघातील यापूर्वीच्या मतदार याद्या रद्दबातल करण्यात आल्याने निवडणुकीचा कार्यक्रम लांबणीवर पडला होता. 
निवडणूक नव्या मतदार यादीनुसार होईल. नाशिक पदवीधर मतदारसंघात सलग दोनदा काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे निवडून आले आहेत. यावेळीही काँग्रेसने पुन्हा त्यांनाच उमेदवारी दिली आहे. भाजपकडून डॉ. प्रशांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसकडून संग्राम कोते-पाटील, तर डाव्या आघाडीकडून राजू देसले निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. बुधवारपासूनच अाचारसंहिता लागू झाली आहे. 
बातम्या आणखी आहेत...