आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे रस्ता, रेल्वेने येणाऱ्यांसाठी सकाळी सहापर्यंत ‘मेगाब्लॉक’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड-सिंहस्थ कुंभमेळ्यातील दुसऱ्या पर्वणीला सर्वाधिक गर्दीची शक्यता गृहीत धरून पहाटे तीन ते सकाळी सहा वाजेपर्यंत नाशिक-पुणे महामार्ग देशभरातून रेल्वेने येणाऱ्या भाविकांना नाशिककडे जाणारा मार्ग बंद राहणार आहे. साधू-संत आणि महंतांचा शाहीस्नानाचा सोहळा पार पडल्यानंतर सकाळी सहा वाजेनंतर नाशिककडील मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.

बाह्य पार्किंग मोहगाव, चिंचोली शिवारात खासगी वाहने, महामंडळाच्या बसने दाखल झालेल्या रेल्वेने आलेल्या भाविकांना सकाळी सहा वाजेपर्यंत स्नानासाठी दसक-पंचक, नांदूर-मानूरच्या रामघाटावर स्नानासाठी शहर बसने सोडण्याची व्यवस्था केली जाणार आहे. दरम्यान, स्नान करून परतणाऱ्या भाविकांना सुरक्षिततेच्या कारणास्तव नाशिकरोड बसस्थानकावर सोडण्यास लाेहमार्ग, रेल्वे सुरक्षा दलाने विरोध केल्यानंतर बससेवेच्या नियोजनात बदल करून प्रवाशांना देवळालीगावातील महात्मा गांधी पुतळ्यावर सोडण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला.

रेल्वे सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक ए. के. सिंग, एस. पी. मिश्रा, लाेहमार्ग पोलिस ठाण्याचे अपर पोलिस महासंचालक डी. कनकरत्ने, पाेलिस अधीक्षक अनंत रोकडे, उपविभागीय अधिकारी माधुरी कांगणे, नाशिकचे सहायक पाेलिस अायुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ निरीक्षक नारायणराव न्याहाळदे, बंदोबस्त अधिकारी पोफळे, सुरक्षा दलाचे निरीक्षक बी. डी. इप्पर, लोहमार्गचे चंद्रशेखर भाबल, रेल्वेस्थानक अधीक्षक एम. बी. सक्सेना, तसेच परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी नाशिकरोड बसस्थानक, रेल्वेस्थानक, मालधक्का, राजवाडा ते मालधक्का मार्ग, महात्मा गांधी पुतळा, महापालिका शाळा क्रमांक १२५ च्या लगतचे माेकळे मैदान, तसेच विहितगाव, पाथर्डीमार्गे त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यांची पाहणी केली.

शहर, त्र्यंबकसाठी सहानंतर बस
पहाटेतीन ते सकाळी सहा वाजेपर्यंत भाविकांना दसक-पंचक, नांदूर-मानूरच्या रामघाटावर स्नान करण्यास जाण्यासाठी सिन्नर फाटा, बाह्य पार्किंगपासून सैलानीबाबा चाैकापर्यंत बससेवा राहणार अाहे. सकाळी सहा वाजेनंतर भाविकांना लक्ष्मीनारायण घाटावर जाण्यासाठी काठे गल्ली, त्रिवेणी गार्डन महामार्गापर्यंत, तसेच त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी बसची व्यवस्था अाहे.

एसटीच्या परतीच्या नियोजनात बदल
एसटीचेपरतीच्या भाविकांना नाशिकरोड बसस्थानकावर सोडण्याचे नियोजन होते. त्यास रेल्वे सुरक्षा यंत्रणेने विरोध केला. स्थानकातील गर्दीवर नियंत्रण ठेवणे अवघड होईल. प्लॅटफॉर्म एकवर बसस्थानकाच्या मागे बॅरिकेड्स लावावे लागतील, असे यंत्रणेने सांगितल्यानंतर पाहणी विचारविनिमयानंतर अखेर भाविकांना महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत सोडण्याचा निर्णय झाला.
नाशिकरोड रेल्वेस्थानक भागात मंगळवारी पाहणी करताना रेल्वे, एसटी पोलिस दलाचे अधिकारी.

सकाळी सहानंतर मार्ग होणार खुले
भाविकांनादसक-पंचक, नांदूर-मानूर घाटावर स्नान करणे बंधनकारक नाही. मात्र, सकाळी सहा वाजेपूर्वी त्यांना नाशिककडे जाता येणार नाही. सकाळी सहानंतर त्यांना नाशिककडे जाण्याचे मार्ग खुले होणार असून, बसची व्यवस्था असल्याचे वरिष्ठ निरीक्षक नारायणराव न्याहाळदे यांनी स्पष्ट केले.