आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्र्यंबकेश्वरला तिसरे शाहीस्नान संपन्न, कैलास मानसरोवरचे तीर्थ कुशावर्तात समर्पित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्तात कुंभपर्वातील तिसरे आणि अखेरचे शाहीस्नान संपन्न झाले आहे. पर्वणीच्या पूर्वसंध्येला सुमारे तीन लाख भाविक येथे दाखल झाले होते. दरम्यान, कैलास मानसरोवरचे तीर्थ कुशावर्त गोदावरीत समर्पित करण्यात आले. या माध्यमातून दोन संस्कृतींचे मिलन झाले असून हा सिंहस्थ आता आंतरराष्ट्रीय कुंभ झाल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
होली वॉटर डीप्लोमसी अंतर्गत हे मिलन झाले असून हा नवा पायंडा पडला आहे. ऑब्झर्व्हर रिसर्च फांऊडेशन आणि चीन सरकारच्या मदतीने हा उपक्रम राबवला असून त्यामुळे भारत व चीनचे संबंध सुधारण्यास मदत होईल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. अाधीच्या दाेन पर्वण्यांप्रमाणेच अाजही दुपारी १२ नंतर सामान्य भाविकांसाठी कुशावर्त तीर्थ स्नानासाठी खुले हाेईल. या पर्वणीसाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह विविध राज्यांचे राज्यपाल आणि केंद्रीय मंत्रीदेखील उपस्थित आहेत.
या पर्वणीलाही भाविकांची कुशावर्तात स्नानासाठी होणारी गर्दी लक्षात घेता यंदा आखाड्यांसोबत कमीत कमी भाविकांना सोडण्याचे नियोजन कायम आहे. शिवाय त्यांचे सर्व आखाड्यांचे शाहीस्नान वेळेत व्हावे, यासाठी मिरवणुकीत प्रत्येक आखाड्याच्या मागे-पुढे पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे.

कुशावर्तासह चार घाटांवर स्नानाची सुविधा
त्र्यंबकेश्वरमध्ये कुशावर्त तीर्थावर साधू-महंतांचे स्नान होईल. दुपारी १२ नंतर भाविकांना स्नान करता येईल. मात्र, इतर ठिकाणच्या घाटांवर मागील पर्वण्यांप्रमाणेच स्नान सुरू राहील. मुंबई -घोटीमार्गाने येणाऱ्यांसाठी तहसील कार्यालयामागील घाट, जव्हार-आंबोलीमार्गाने येणाऱ्यांसाठी संत निवृत्तिनाथरोडने गंगासागर तलाव येथून आहिल्या डॅम घाट, नाशिक आणि गिरणारे -रोहिले मार्गाने येणाऱ्यांसाठी नवीन बसस्थानक, नवीन पेट्रोलपंपाजवळ‌ील आहिल्या घाटांवर स्नानाची व्यवस्था केली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, नाशिकमधील तिसऱ्या शाहीस्नानाचे PHOTO