आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आखाडा परिषदेचे अध्यक्ष ग्यानदास महाराजांकडून छळ झाल्याची तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आखाडा परिषदेचे अध्यक्ष ग्यानदास महाराज यांनी असभ्य वर्तन करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा तक्रार अर्ज साध्वी त्रिकाल भवन्ता यांनी मंगळवारी पंचवटी पाेलिस ठाण्यात दिला अाहे. आखाड्यांचे ध्वजारोहणाच्या पूर्वसंध्येलाच साध्वीने तक्रार दिल्याने हा वाद अाणखी वाढण्याची चिन्हे अाहेत.

पुरोहित संघाच्या वतीने रामकुंड परिसरात १४ जुलैला ध्वजारोहण करण्यात अाले. या कार्यक्रमात ग्यानदास महाराज व त्यांच्या सहकाऱ्यांनी असभ्य वर्तन केले. तसेच छेडछाड करून मला व्यासपीठावरून ढकलून जिवे मारण्याची धमकीही दिली हाेती, अशी तक्रार करून त्यांच्यावर कारवाईची मागणी त्रिकाल भवन्ता यांनी केली अाहे. यापूर्वी साध्वीने केलेल्या आरोपांनी व्यथित होऊन ग्यानदास यांनी नाशिक सोडण्याचा निर्णय घेतला होता.