आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पष्टीकरण: अामचा विराेध साईबाबांना नव्हे, तर गाेरखधंद्यांना, स्वामी स्वरूपानंद सरस्वती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्र्यंबकेश्वर- ‘शिर्डीच्या साईबाबांना व्यक्ती म्हणून विराेध नसून, त्यांना देव बनवून धंदा मांडणाऱ्यांना विराेध अाहे. एखाद्या मृत व्यक्तीस देवता मानून गाेरखधंदा मांडणाऱ्यांना पायबंद घालणे, हे शंकराचार्यांचे पीठाधीश्वर म्हणून कामच अाहे,’ असे स्पष्टीकरण शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी शुक्रवारी दिले. मी शिर्डी ट्रस्टच्या उद्याेगांविषयी केलेल्या वक्तव्यांचा महंत ग्यानदास यांनी विपर्यस्त प्रचार केल्यामुळेच न्यायालयात फिर्याद दाखल केल्याचे सांगितले.

चतुर्मासासह सिंहस्थ कुंभपर्वासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये अालेल्या स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयावर मत मांडले. सनातन धर्माच्या संरक्षणासह त्याच्या प्रचार-प्रसारासाठी अाद्य शंकराचार्यांनी चार पीठे स्थापन केली. त्यावर पात्र व्यक्तींची परीक्षेद्वारे नियुक्ती केली जाते. ती पदवी नाही. शंकराचार्य हे धर्माचे विवेचनदेखील करतात. मात्र, अाता घराेघरी शंकराचार्य निर्माण झाले, तर निर्णायक काेण ठरेल, असा प्रश्न निर्माण हाेईल, त्यामुळे चार पीठांशिवाय इतर शंकराचार्य नाहीत, पीठाधीश्वरांचाच निर्णय प्रमाण मानण्यात यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
देश नशामुक्त करावा
अातापर्यंत सनातन धर्मावर अाक्रमणे झाली. अाता परकीय देशातील युवकांना उद‌्ध्वस्त करण्यासाठी अंमली पदार्थांचा पुरवठा करीत अाहेत. या धंद्यातूनच पाकिस्तानसारखे देश शस्त्रसज्ज हाेऊन सीमेवर सैनिकांसह नागरिकांना लक्ष्य करतात. हे चित्र बदलण्यासाठी युवकांना सन्मार्गावर नेऊन भारत नशामुक्त करण्याचा सर्वांनी संकल्प करावा. विश्वाला अादर्शवत अशी शक्ती निर्माण करण्यासाठी सर्वांगीण प्रयत्नांची गरज असल्याचे शंकराचार्य म्हणाले.
रामायण, महाभारत शिकवले तर रामराज्य
गीता, रामायण, महाभारत या धर्मग्रंथांमध्ये वाईट वागणाऱ्यांना हाेणाऱ्या शिक्षा व अादर्श बनण्याच्या पद्धतींचा विचार अाहे. त्यामुळे हे ग्रंथ शाळा, महाविद्यालयातून शिकवण्यात यावे. म्हणजे संस्कारित पिढी घडून रामराज्य निर्माण हाेईल, असे मत स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी मांडले.