आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

"नो एंट्री'पर्यंत दुचाकीस मुभा, दुसऱ्या पर्वणीत बल्ली बॅरिकेडिंग हटवणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- भमेळ्याच्यादुसऱ्या पर्वणीत नवीन नियोजनानुसार नो एंट्री झोनपर्यंत शहरवासीयांना दुचाकी आणता येईल. तसेच बल्ली बॅरिकेडिंग हटविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
पहिल्या पर्वणीच्या बंदोबस्तातील त्रुटी शहरांतर्गत बॅरिकेडिंगच्या नियोजनाबाबत नागरिकांच्या भावना तसेच सूचनांचा विचार करून बदल केल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या पर्वणीसाठी लाखोंच्या संख्येने भाविक येणार असल्याचा अंदाज असल्याने त्यावेळी आवश्यकतेनुसार बॅरिकेडिंग नियोजनात बदल केले जातील.

शहरातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार असल्याचे सांगत नाशिककरांनी पवित्र स्नानासाठी यावे, असे आवाहनही त्यांनी केले. पहिल्या पर्वणीच्या नियोजनातील त्रुटी लक्षात घेता बंदोबस्तामध्ये काही बदल करण्यासाठी स्वत: पोलिस आयुक्तांनी उर्वरितपान.
दुचाकी पार्किंग
- धुळे-औरंगाबादरोड,आडगाव परिसर : अमृतधामचौक, मिरची ढाबारोडवरील दोन्ही बाजूचे रस्ते.
- नाशिकरोडउपनगर, जयभवानीरोड, आंबेडकरनगर, देवळाली परिसर : श्रीश्री रविशंकर मार्ग, अशोका स्कूल समोरील मोकळे पटांगण.
- गंगापूर,सातपूर, अंबड, परिसर : ईदगाहमैदान.
- इंदिरानगर,अंबड परिसर : किनाराहॉटेल मागे.
- गंगापूर,पंचवटी परिसर : डोंगरेवसतिगृह.
- पेठरोडपरिसर : शरदचंद्रपवार फळ मार्केट.
- दिंडोरीरोडपरिसर : मेरीमैदान.
बाहेरगावच्या भाविकांसाठी बससेवा
धुळे-आडगाव,के. के. वाघ.
मुंबई-राजूरबहुला, महामार्ग बसस्थानक.
पेठ-राऊहॉटेल, डोंगरे वसतिगृह.
औरंगाबाद-माडसांगवी,के. के. वाघ
दिंडोरी-आरोग्यविद्यापीठ, के. के. वाघ.
पुणे-मोहशिवार, महामार्ग.
त्र्यंबकेश्वर-नवीनसीबीएस, जव्हार फाटा.
खंबाळे-खंबाळे,जव्हार फाटा.
घोटीत्र्यंबक- पहिणे,जव्हार फाटा.
जव्हार-अंबोली,जव्हार फाटा.
नाशिकरोडते त्र्यंबक- रेल्वेबसस्थानक.
शिर्डी-निलगिरीबाग, महामार्ग.
शहरांतर्गत या मार्गावरून बससेवा
- उपेंद्रनगरते ईदगाह मैदान (१५ बस), मार्ग: उत्तमनगर, सिटी सेंटर मॉल, एबीबी सर्कल, मायको सर्कल, जिल्हा रुग्णालय.
- अंबडते महामार्ग (१० बस), मार्ग: पांडवलेणी, लेखानगर, महामार्ग, सुयोग हॉस्पिटल, चांडक सर्कल, मायको सर्कल, जिल्हा रुग्णालय.
- शिवाजीनगरते ईदगाह मैदान (१० बस), मार्ग: श्रमिकनगर, सातपूर, मायको सर्कल, जिल्हा रुग्णालय.
- पाथर्डीगाव ते महामार्ग (५ बस), मार्ग: विनयनगर, जॉगिंग ट्रॅक, महामार्ग, चांडक सर्कल, मायको सर्कल, जिल्हा रुग्णालय.
- गिरणारेते डोंगरे वसतिगृह (१० बस), मार्ग: सोमेश्वर आनंदवली.
- भगूरते महामार्ग ( १५ बस), मार्ग: देवळाली, वडनेर गेट, पाथर्डी फाटा, महामार्ग, चांडक सर्कल, मायको सर्कल, जिल्हा रुग्णालय.
- नाशिकरोडते महामार्ग ( ५० बस), मार्ग: आंबेडकरनगर, डीजीपीनगर, वडाळागाव, वनवैभव, लेखानगर, महामार्ग, चांडक सर्कल, मायको सर्कल, जिल्हा रुग्णालय.
- म्हसरूळते डोंगरे वसतिगृह ( बस), मार्ग: मेरी, आरटीअाे, चोपडा लॉन्स.
- म्हाडाते ईदगाह मैदान ( बस), मार्ग: सातपूर, जिल्हा रुग्णालय.
- उत्तमनगरते ईदगाह मैदान ( बस), मार्ग: विजयनगर, राणा प्रताप चौक, लेखानगर, महामार्ग, चांडक सर्कल, मायको सर्कल, जिल्हा रुग्णालय.
- नाशिकरोडते काठेगल्ली ( ५० बस), मार्ग: अशोका टॉवर, काठेगल्ली, सिग्नलमार्गे नाशिकरोड.