आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हात-पाय नसलेली ‘ती’ अचानक पाच महिन्यांनी परतली कार्यालयात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘ती’ला ना हात, ना पाय म्हणूनच ‘ती’ ना टेबलावरून उतरू शकत हाेती ना कपाट उघडून कार्यालयाच्या बाहेर जाऊ शकत हाेती. पण ‘ती’ एके दिवशी अचानक गायब झाली. तिच्या गायब हाेण्याने उद्याेगवर्तुळात चांगलीच चर्चा रंगली तर एकाची दूरदेशी बदली झाली अन‌् एकाचे निलंबन झाले. मात्र ही हात-पाय नसलेली, काल अचानक अापल्या कार्यालयात परतली अन‌् अनेकांना अाश्चर्याचा ‘धक्काच’ बसला. कारण, ‘ती’ गेल्यामुळे मागच्याच अाठवड्यात दाेघांना ‘शिक्षा’ मिळाल्याची गाेष्ट ताजी अाहेच पण अाता ‘ती’परत अाल्याने कितीजण अडकणार हे पाहणे अाता महत्त्वाचे ठरणार अाहे. 
 
एमअायडीसीच्या प्रादेशिक कार्यालयातील बहुचर्चित प्रकरणातील ‘ती’ म्हणजे पाच महिन्यांपासून ज्याची उद्याेगवर्तुळात प्रचंड चर्चा सुरू अाहे, त्या गहाळ झालेल्या कागदपत्रांची ‘फाइल’ अाहे. सातपूर अाैद्याेगिक वसाहतीतील क्रमांक ‘ई-१ ते ई-४’ या भूखंडाच्या संदर्भातील ही फाइल असून ‘ती’च्यातील कागदपत्रे नाेव्हेंबर २०१६ मध्ये गहाळ झाली हाेती. उद्याेजक इंदरपालसिंग सहानी यांच्या भूखंडाची फाइल असून या गहाळ प्रकरणाच्या संदर्भात एमअायडीसीच्या प्रादेशिक कार्यालयाने सातपूर पाेलिस ठाण्यात याबाबत तक्रार केली हाेती. यात संशयितांची विभागीय चाैकशी व्हावी कारवाई करण्यात यावी असा प्रस्ताव एमअायडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी मुंबई येथील मुख्यालयाकडे पाठविला हाेता. 
इकडे प्रादेशिक कार्यालयात कर्मचाऱ्यांनी जंग जंग पछाडूनही ‘ती’ सापडत नव्हती. दरम्यान, याप्रकरणी एका अधिकाऱ्याची अाैरंगाबादला तडकाफडकी बदली करण्यात अाली तर एका सर्वेअरचे निलंबन करण्यात अाले. एमअायडीसीतील या घडामाेडीमुळे मात्र उद्याेग वर्तुळात याची चर्चा सुरू अाहे. 

काेणालाही पाठीशी घालणार नाही 
^या प्रकरणीपाेलिसांत तक्रार दिली हाेती. चाैकशीअंती दाेघांवर कारवाईही झाली. काही दिवसांनी मी बैठकीत असताना कार्यालयातून काॅल अाला की, काेणीतरी फाइल टेबलवर अाणून ठेवली. फाइल ठेवणारे ‘ते’ काेण याचा शाेध घ्यावा असे पाेलिसांना पत्र दिले अाहेे. याप्रकरणी काेणालाही पाठीशी घालणार नाही. - हेमांगी पाटील, प्रादेशिक अधिकारी, एमअायडीसी 

अाणि ‘ती’अचानक प्रकटली 
यादाेन कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारून चार दिवस उलटत नाहीत ताेच ‘ती’ अचानक जेथून गायब झाली हाेती, त्याच प्रादेशिक कार्यालयात बुधवारी अचानक एका टेबलावर प्रकट झाली, हात-पाय नसल्याने ती काेणाची मदत घेऊन कार्यालयात अाली याची उत्सुकता अाता कर्मचाऱ्यांना लागून राहिली अाहे. 

‘ती’च्यामुळे एमअायडीसीच्या कामकाजावर प्रकाश 
या फाइलच्या गहाळ हाेण्यामुळे एमअायडीसीचे कामकाज कशाप्रकारे सुरू हाेते, याची चर्चा उद्याेगवर्तुळात रंगली अाहे. तर बाहेर अाराेप-प्रत्याराेपांच्या फैरी झडत अाहेत. मात्र कारवाईचा बडगा उगारल्यावर या कार्यालयात अाता काेणीही अापल्या कपाटाला कुलूप लावल्याशिवाय अापली जागा साेडत नाही किंवा चुकीनेही एकही फाइल टेबलावर ठेवून जात नाही असा माेठा बदल पहायला िमळत अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...