आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेदवारांमध्ये वाद, तणाव वाढल्याने शहरात पाेलिसांकडून धडक कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशिक महानगर पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी देण्यावरून झालेल्या वादात भाजप, शिवसेना या दोन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्येच ‘राडा’ झाल्याने शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले अाहे. निवडणुकीपूर्वीच वादाची ठिणगी पडल्याने ही आग वेळीच शमवण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून शहरात धडक कारवाईला सुरुवात झाली आहे. पोलिस आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरून धडक कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशान्वये शनिवारी शहरात सर्वत्र कोम्बिंग कारवाई करण्यात आली. 
 
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शिवसेनेच्या शहराध्यक्षांना धक्काबुक्की, पंचवटीमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराकडून एबी फॉर्म फाडण्याचा प्रकार आणि सिडको, सातपूर, मध्य नाशिक, नाशिकरोड येथेही वाद झाल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली. 
 
वादाबाबत सहा कार्यकर्त्यांवर गुन्हा 
एका राजकीव पक्षाच्या दाेन पदाधिकाऱ्यांमध्ये शुक्रवारी झालेल्या वाद हाणामारीचा प्रकार लक्षात घेत मुंबई नाका पाेलिस ठाण्यात संबंधित पक्षाच्या सहा कार्यकर्त्यांवर पाेलिसांनी जमावबंदीचा भंग केल्याचा गुन्हा दाखल केला अाहे. 
 
कडक कारवाई होणार 
निवडणुकीच्या काळात कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. कुणाची गय केली जाणार नाही. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित राजकीय पदाधिकाऱ्यांसह सर्वांवर कारवाई करण्यात येणार आहे.
-डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त 
बातम्या आणखी आहेत...