आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापालिकेला १४ दिवसांत लागली ३० काेटींची लाॅटरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - हजार पाचशे रुपयांच्या नाेटा स्वीकारण्याची तयारी दाखवल्याचा लाभ म्हणून महापालिकेला गेल्या १४ दिवसांत तब्बल ३० काेटी रुपयांचा महसूल मिळाला असून, या नाेटा स्वीकारण्याची मुदत गुरुवारी (दि. २४) मध्यरात्री १२ वाजेपर्यंतच असणार अाहे.
महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांना जुन्या नाेटा कर भरण्यात स्वीकारण्याचे अादेश देण्यात अाले हाेते. त्यानंतर महापालिकेने प्रारंभी मध्यरात्रीपर्यंत विभागीय करभरणा केंद्रे सुरू ठेवली. त्यामुळे महापालिकेला काेट्यवधी रुपयांची जणू लाॅटरीच लागली. गेल्या अनेक वर्षांपासून असलेली थकबाकी महापालिकेला विनासायास मिळू लागली. गेल्या पंधरवडाभरात महापालिकेला जवळपास ३० काेटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला अाहे. त्यात घरपट्टीचे १३ काेटी ३० लाख हजार, तर पाणीपट्टीचे तीन काेटी २० लाख ५२ हजार अशा कर भरण्याचा समावेश अाहे. नगररचना विभागाकडून ११ काेटी २८ लाख, तर विविध कर भागाकडून दाेन काेटी लाख रुपयांचा महसूल मिळाला अाहे.

अंबडला पार्किंगची जागा सील : १०हजारांपुढील बड्या थकबाकीदारांना मिळकत जप्तीचे वाॅरंट बजावले जात असून, ते बजावल्यानंतरही घरपट्टी भरणाऱ्यांच्या मिळकती सील केल्या जात अाहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने १५ मालमत्ताधारकांना वाॅरंट बजावले हाेते. त्यापैकी १५ मालमत्ताधारकांनी १६ लाख ५८ हजाराची थकबाकी भरली. मात्र, अंबड येथे एका खासगी जागेत एका अाॅटाेमाेबाॅइल कंपनीच्या पार्किंगची जागा सात लाखांची थकबाकी भरल्यामुळे सील करण्यात अाली.

बातम्या आणखी आहेत...