आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या नगरसेवकांना ‘अच्छे दिन’, मानधन अाता दुप्पट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गेल्या अनेक वर्षांपासून मानधनवाढीची प्रतीक्षा करणाऱ्या नगरसेवकांना अाता ‘अच्छे दिन’ येणार असून, नगरविकास खात्याने नगरसेवक निधी साडेसात हजारांवरून पंधरा हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला अाहे. त्यामुळे खासदार अामदारांच्या वेतनवाढीच्या मागणीनंतर महासभेत घसाफाेड करणाऱ्या नगरसेवकांना दिलासा मिळणार अाहे. 
 
महापालिकेतील नगरसेवकांचा मानधनवाढीचा मुद्दा अनेक वर्षांपासून भिजत पडला अाहे. अलीकडेच महासभेत सातपूरचे नगरसेवक राजेंद्र धिवरे यांनीही नगरसेवक निधी वाढवून देण्याची मागणी केली हाेती. यापूर्वी मुंबई महापालिकेने २००८ मध्ये नगरसेवकांचे मानधन वाढवले हाेते तर त्यानंतर दाेन वर्षांनी म्हणजेच २०१० मध्ये राज्यातील अन्य महापालिकांतील नगरसेवक निधीत वाढ झाली हाेती. दरम्यान, अाता वाढती महागाई, टपाल, दूरध्वनी, लेखन सामग्रीचा खर्च लक्षात घेता राज्य शासनाने नगरसेवक निधी वाढवला अाहे. 
 
अशी अाहे वाढ : ‘अप्लस’ महापालिकेच्या नगरसेवकांसाठी पंचवीस हजार रुपये, ‘अ’ वर्ग महापालिकेसाठी वीस हजार रुपये, ‘ब’ वर्ग महापालिकांच्या नगरसेवकांसाठी पंधरा हजार रुपये तर ‘क’ ‘ड’ वर्ग महापालिकांच्या नगरसेवकांसाठी दहा हजार रुपये मासिक मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक महापालिका ‘ब’ वर्गात माेडत असल्यामुळे सध्याचे साडेसात हजारांवरून पंधरा हजार रुपये इतके मानधन हाेईल. नगरसेवक मानधनासाठी साधारण १९ लाखांचा खर्च महापालिकेला येणार अाहे. 
बातम्या आणखी आहेत...