आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१०७ काेटींचा अनियमितता अहवाल विनाचर्चा मंजूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेत मनसेची सत्ता असताना सन २०१३-२०१४ अाणि २०१४-२०१५ या दाेन वर्षांच्या कार्यकाळात १०७ काेटी रुपयांची प्रशासकीय अनियमितता झाली असून, १३ काेटी रुपयांची वसुली करण्याची शिफारस स्थानिक निधी लेखापरीक्षकांनी केली अाहे. मनसेच्या काळात ही अनियमितता झाली असली तरी, त्यात लाेकप्रतिनिधीपेक्षा प्रशासनच अधिक जबाबदार असल्याचे चित्र अाहे. दरम्यान, करवाढीच्या वादात भाजपने महासभा गुंडाळल्यामुळे विनाचर्चाच अहवाल मंजूर झाल्याचे चित्र अाहे. 
 
तेराव्या वित्त अायाेगाच्या शिफारशीप्रमाणे दरवर्षी पालिकेचे वित्तीय लेखापरीक्षण केले जाते. स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागामार्फत नियंत्रण महालेखापरीक्षक यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली हे लेखापरीक्षण केले जाते. येत्या महासभेत सन २०१३-२०१४ अाणि सन २०१४-२०१५ या कार्यकाळातील अनेक गंभीर अाक्षेपांबाबतचा अहवाल ठेवण्यात अाला अाहे. यावेळी महापालिकेत मनसेची सत्ता हाेती अनुक्रमे पहिल्या वर्षी अॅड. यतिन वाघ तर दुसऱ्या वर्षी अशाेेक मुर्तडक हे महापाैर हाेते. दरम्यान, १९ अाॅगस्ट राेजीच्या महासभेत लेखापरीक्षण विभागाने दाेन्ही वर्षांचे अहवाल चर्चेसाठी ठेवले हाेते. मात्र, करवाढीवरून झालेल्या गाेंधळात महासभा गुंडाळली गेल्यामुळे त्यावर चर्चा झाली नाही. 

चुंचाळे घरकुल याेजनेत साडेसहा काेटी भुईसपाट : सन२०१४-२०१५ मधील अहवालात चुंचाळे घरकुल याेजनेत मक्तेदाराने विलंब केल्यामुळे २२४० लाभार्थ्यांना घरापासून वंचित रहावे लागल्याचे मत व्यक्त केले अाहे. मुख्य म्हणजे, ज्या जागेवर सपाटीकरणाचे काम केले गेले, तेथील घरेच रद्द झाल्यामुळे सहा काेटी ४० लाख रुपये भुईसपाट झाल्याची धक्कादायक बाब अाहे. मक्तेदारास प्रत्यक्षात लाइन अाऊट दिलेल्या इमारत कामाच्या माेबिलायझेशनसाठी अग्रीम दिला गेला. ठरावीक कालावधीत वसुली अपेक्षित असताना त्याकडे कानाडाेळा केल्यामुळे अाजघडीला चार काेटी ७० लाख रुपये ठेकेदाराकडेच थकबाकी अाहे. दाेन वर्षांच्या पुढील कालावधीसाठी स्टार रेट फरकाची रक्कम देय करण्यात अाली अाहे. महासभेत साडेसहा काेटींवरून भाजप अाक्रमक हाेण्याची शक्यता अाहे. 

खासगी वाहनांवर पावणेनऊशे लिटरचा धूर : पालिकावाहनांना इंधन पुरवठ्यासाठी २०१३-२०१४ या वर्षात घाेळ झाल्याचेच चित्र अाहे. ज्या पेट्राेलपंपाची निवड झाली त्याचा अाधारच स्पष्ट झालेला नाही. विशेष म्हणजे यात एमएच १५, ९८९९ या खासगी वाहनावर तब्बल ८४९.५ लिटर डिझेलचा खर्च महापालिकेच्या फंडातून झाला अाहे. दरम्यान हे वाहन काेणाचे हे शाेधण्याचे कष्टही महापालिकेने घेतल्याचे दिसत नाही. दिव्य मराठीने क्रमांकावरून माहिती घेतली असताना किरण बागुलनामक व्यक्तीच्या नावावर स्विफ्ट डिझायर हे वाहन असल्याचे अारटीअाेच्या अाॅनलाईन नंबर ट्रॅकिंग संकेतस्थलावरून समाेर अाले. 

अागरटाकळीमल जल केंद्रांत ठेकेदाराचे लाड : भुयारीगटार याेजनेंतर्गत अागरटाकळी येथे ४० दशलक्ष लिटर क्षमतेचे मलनि:सारण केंद्र बांधणे पुढील तीन वर्षे देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी माेबिलायझेशन अग्रीम किमान दाेन हप्त्यात देणे अपेक्षित हाेते. मात्र, मंजूर निविदा रकमेच्या १० टक्के म्हणजेच दाेन काेटी ६० लाख काेटी एकरकमी प्रदान केले गेले. त्यानंतर ६३ लाख ६१ हजारांचा अग्रीम दिला असून, ठेकेदाराचे एकप्रकारे लाड केल्याचे दिसत अाहे. एवढेच नव्हे तर, कामाची गती वाढवण्यासाठी वेळाेवेळी १३ लाख ५१ हजार रुपये इतका दंड केला गेला. मात्र, ताेही परत करून केवळ दीड लाखाची वसुली झाल्याचे दिसत अाहे. ठेकेदाराचे लाड करण्याच्या प्रकारावर लेखापरीक्षकांनी अाक्षेप घेतला अाहे. 

विनानिविदा सायकल खरेदी 
माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी नगामागे ३१५० याप्रमाणे १६ लाख ३४ हजार रुपयांची सायकल खरेदी करण्यात अाली. मात्र, खरेदीसाठी निविदा प्रक्रियेला बगल दिली गेली. दरपत्रकानुसार सायकल खरेदी करताना सविस्तर अंदाजपत्रक केले गेले नाही. तसेच प्रशासकीय मान्यताही घेतली गेली नाही. मुख्य म्हणजे, मुख्याध्यापकस्तरावर सायकल खरेदी झाल्यामुळे माेठा संशय निर्माण झाला अाहे. 

असे अाहेत प्रमुख अाक्षेप 
{फाळके स्मारकाची देयके उपलब्ध झाल्यामुळे ८२ लाख ८३ हजारांचा खर्च अाक्षेपाधीन अाहे. उपाहारगृह, विश्रामगृह, फूड स्टाॅलच्या मासिक भाडे विद्युत देयकापाेटी १० लाख ५६ हजारांची रक्कम मक्तेदाराकडे थकीत अाहे. 

{ घंटागाडीद्वारे केरसंकलनाच्या कामाचा विमा विलंबाने काढला असून, विलंब शुल्क प्रतिदिन १० हजार याप्रमाणे पाच काेटी २९ लाखांची वसुली बाकी अाहे. 
बातम्या आणखी आहेत...