आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासनाचा निधी हजारो, दुबळी पालिकेची झोळी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- याना त्या कारणाने महापालिकेतून निधी नाही, तिजाेरीत खडखडाट.. यासाठी पैसे नाही, त्यासाठी पैसे नाही, अशी बाेंब हाेत असते. याला कारण पालिकेतील काही अधिकाऱ्यांचा अविचारच अाहेे. साधा शासनाचा महसूलही शासनाकडे वळवता येत नसल्याने शासनाकडून हाेत असलेल्या नाट्य स्पर्धांतून उघड हाेते अाहे. कालिदास कलामंिदरात हाेणाऱ्या सर्व स्पर्धा अाता परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हाेणार असून, त्या पैशांवरही महापालिकेला अाता पाणी साेडावे लागले अाहे.

राज्य शासनाच्या सांस्कृतिक केंद्र संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या नाट्य स्पर्धा १७ नाेव्हेंबरपासून सुरू हाेत अाहेत. प्रारंभी राज्य नाट्य स्पर्धा त्याला लागूनच बालनाट्य स्पर्धा, संस्कृत नाट्य स्पर्धा, हिंदी नाट्य स्पर्धा अाणि कामगार कल्याणच्या नाट्य स्पर्धा हाेतात. अनेक वर्षे राज्य नाट्य स्पर्धांसह सर्वच स्पर्धा या महाकवी कालिदास कलामंदिरात हाेत असत. दाेन वर्षांपासून या सर्व स्पर्धा प. सा. नाट्यगृहात हाेत अाहेत. कामगार कल्याण मंडळाच्या नाट्य स्पर्धा मात्र कालिदास कलामंदिरात हाेत असत. पण, यंदापासून त्या स्पर्धाही प. सा. नाट्यगृहात हाेणार अाहेत. शासनाच्या या स्पर्धा जरी प्राइम टाइम अर्थात शनिवार रविवारी नसल्या तरी दाेन-अडीच महिने सलग सुरू असतात. एवढे माेठे बुकिंग पालिकेला सांस्कृतिक खात्याकडून मिळणार हाेते. पण, अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे हे सर्व पैसे सार्वजनिक वाचनालयाच्या तिजाेरीत जमा हाेणार अाहेत.

अधिकाऱ्यांना माहितीच नाही
महापालिकेच्यासहायक अायुक्त वसुधा कुरणावळ यांना विचारले असता, त्या म्हणाल्या की, या संदर्भात मला काहीच माहिती नाही. मला माहिती घ्यावी लागेल.
अशी अाहेत कारणे
- महाकवी कालिदास कलामंदिराची दुरवस्था.
- नाटक सादरीकरणासाठी लागणाऱ्या साहित्याची उपलब्धता नसणे.
- या नाट्यगृहात स्पर्धा हाेण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्नच केले नाहीत.
- हाैशींसाठी स्पर्धा असल्याचे कारण दिले जाते.
- नाट्यगृह माेठे असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते.
- प. सा. नाट्यगृहाचे हाेत असलेले नूतनीकरण.
- नाटक सादर करण्यासाठी लागणारे साहित्य तत्काळ उपलब्ध हाेते.
- मुळातच प. सा.चे नाट्यगृह सचिव हे नाट्यचळवळीतील असल्याने ते उत्साहाने सहभागी असतात.
- प. सा. नाट्यगृहात पे अॅण्ड पार्कचा प्रश्नच नाही.
- काहीही अडचण अाली तर तत्काळ नाट्यगृह सचिवांना भेटता येते.

प. सा. अाटाेपशीर, सुविधायुक्त...
प.सा. अतिशय अाटाेपशीर अाहे. त्याचे नूतनीकरणाचे कामही सुरू अाहे. सुविधाही मिळतात. ही स्पर्धा ही हाैशी रंगकर्मींसाठी असते. त्यासाठी फार माेठा रसिकही बऱ्याचदा येत नाही. तुलनेने मग कालिदास कलामंदिर माेठे पडते. त्यामुळे अाम्ही सर्वच स्पर्धा प. सा.त ठेवलेल्या अाहेत. अजयअांबेकर, संचालक, राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय