आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याद्यांअभावी रखडली मतदार नावनोंदणी, नोंदणीसाठी जाणारे नागरिक दर रविवारी माघारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका फेब्रुवारी २०१७ मध्ये हाेत असल्याने, शासनाच्या वतीने मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचे काम हाती घेण्यात अाले अाहे. नागरिकांच्या साेयीसाठी ११ १८ अॉक्टाेबर या दाेन रविवारी विशेष माेहिमेद्वारे शहरातील ३१८ शालेय केंद्रांवर केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (बीएलअाे) हे काम सुरू हाेते. मात्र, सातपूर विभागातील माॅडर्न स्कूलच्या मुख्याध्यापकांनी याद्या नसल्याचे कारण सांगत बीएलअाेंची व्यवस्था केल्याने येथील नागरिकांना मतदार यादीत नाेंद करण्यापासून वंचित राहावे लागले.
नवमतदारांना तसेच ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत, त्यांच्या नावनाेंदणीसाठी मतदार याद्यांच्या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत शहरातील ३१८ मतदान केंद्रांवर बीएलअाेंमार्फत मतदार याद्यांमध्ये नावनाेंदणी, नावात बदल, पत्ता बदल, नाव वगळणे ही कामे हाती घेण्यात अाली. नागरिकांनीही उत्साहाने मतदान केंद्रावर जाऊन नवीन नावनाेंदणीसह मतदार याद्यांमध्ये बदल करण्याचा फाॅर्म बीएलअाेंकडे भरून दिला. सातपूर विभागातील विधानसभा क्रमांक १२५ मधील माॅडर्न हायस्कूल येथे अालेले बीएलअाे प्रमिला बाेरसे (क्रमांक १५६), प्रवीण पाटील (क्रमांक १५७) महेंद्र पवार (क्रमांक १५८) हे अादेशाप्रमाणे अाले. मात्र, त्यांना शाळेच्या बाहेरच ताटकळत राहावे लागले. मागील रविवारीही शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापकांनी मतदार याद्याच नसल्याचे सांगून बीएलअाेंना टाळले हाेते. त्याचीच पुनरावृत्ती या रविवारी झाल्याने उपस्थित बीएलअाेंनाच नागरिकांच्या राेषाचा सामना करावा लागला. या संदर्भात सातपूर विभागाचे तलाठी जितेंद्र क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला असता, माझ्याकडे मतदार याद्या दिल्याबाबतचे रिसीव्ह असून, संबंधित मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.

नाेव्हेंबरपर्यंत नोंदणी
विधानसभेच्या१२३, १२४, १२५ १२६ या मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचे काम अॉक्टाेबर ते नाेव्हेंबरपर्यंत हाेणार अाहे. ११ १८ तारखेला रविवार असल्याने या दाेन्ही दिवशी विशेष माेहीम राबविण्यात अाली. मात्र, ज्या मतदारांना नाेंदणी करायची असेल त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अावारातील संबंधित विधानसभा मतदारसंघात जाऊन बदल करता येणार अाहे.
सातपूरच्या सावरकरनगरातील माॅडर्न स्कूलसमाेर बीएलअाेंशी चर्चा करताना नागरिक.
व्यवस्था केली नाही

अाम्हीसर्व मुख्याध्यापकांशी पत्रव्यवहार केेलेला अाहे. त्यामुळे त्यांनी या कामासाठी शाळा अंतर्गत व्यवस्था करणे अावश्यक हाेते. बीएलअाेंचा रिपाेर्ट अाल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याची शिफारस करण्यात येईल. महेशचाैधरी, तहसीलदार, नाशिक