आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंडखाेरांना लगाम, महाअाघाडीची प्रभाग सभापती निवडणुकीत सरशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उफाळून अालेली बंडखाेरी त्यामुळे सत्ताधारी मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेसला बंडखाेरीचा माेठा फटका बसण्याची भीती असताना, पक्षादेश अर्थातच व्हीपचा फाॅर्म्युला महाअाघाडीसाठी तारणहार ठरला. परिणामी, सिडकाेत महाअाघाडीतील काँग्रेसच्या अश्विनी बाेरस्ते, सातपूरला मनसेच्या सविता काळे, तर नाशिकराेडला शिवसेनेचे सर्वाधिक संख्याबळ असल्यामुळे सूर्यकांत लवटे यांची वर्णी लागली. पक्षादेश माेडल्यानंतर मनसेच्या दाेन नगरसेवकांचे सदस्यत्व अपात्र झाल्याचे बघून काही बंडखाेर नगरसेवकांनी दवाखान्यात असल्याचे पत्र धाडले, तर माकपच्या नगरसेवकांनी तटस्थ राहण्याचे अादेश धुडकावत चक्क प्रतिस्पर्ध्यांना मतदान करण्याचा अजब प्रकार केला.

प्रभाग समिती सभापतिपदाच्या िनवडणुकीत बंडखाेरांची समस्या सर्वच पक्षांना सतावत हाेती. खासकरून मनसे, राष्ट्रवादीला माेठा फटका बसण्याची भीती हाेती. या पार्श्वभूमीवर दाेन िदवसांत नगरसेवकांच्या घरापासून तर वर्तमानपत्रात जाहीररीत्या पक्षादेश बजावण्यात अाला. महाअाघाडीतील तडजाेडीप्रमाणे काेणाला मतदान करायचे याबाबतही स्पष्ट अादेश देण्यात अाले हाेते. परिणामी बंडखाेरांची अडचण झाली. मनसे नगरसेवक अरविंद शेळके शिवसेनेत गेले असले तरी पत्राद्वारे प्रकृतीचे कारण देत हजर नसल्याचे कळवले. उद्या बंडखाेरांना सभापतिपद देण्याची चाल खेळली तर अपात्रतेची भीती असल्यामुळे शिवसेना भाजपने सावध पवित्रा घेतला.
सेना-भाजपच्यासुप्त संघर्षात महाअाघाडीला लाभ : प्रभागसमिती निवडणुकीनिमित्त भाजपला शह देण्याची शिवसेनेेने संधी साेडली नसल्याचे दिसून अाले. नाशिकराेडमध्ये शिवसेनेला स्पष्ट बहुमत असताना दुखावण्याची भूमिका महाअाघाडीने घेतली. त्याबदल्यात सातपूरमध्ये शिवसेनेने फारसा रस घेतला नाही. हीच परिस्थिती पंचवटी, नाशिक पश्चिम नाशिक पूर्व येथे बुधवारी हाेणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेची राहील, असे दिसते. नाशिक पूर्व पश्चिममध्ये मनसेतून शिवसेनेत गेलेल्या बंडखाेरांसह नगरसेवक तटस्थ राहण्याची शक्यता अाहे. दुसरीकडे सिडकाेत भाजपचे अपूर्व हिरे यांनी गैरहजर राहून शिवसेनेला काही प्रमाणात झटका देण्याचा प्रयत्न केला.

तीन प्रभागांनिमित्ताने अाज भाजपविराेधात सर्वपक्षीय संघर्ष
गुरुवारीनाशिक पूर्व, नाशिक पश्चिम पंचवटी या तीन प्रभाग समिती सभापतिपदासाठी िनवडणूक हाेत अाहे. त्यात पंचवटीत मनसेकडून रुची कुंभारकर यांना संधी दिली जाणार असून, या ठिकाणी २४ संख्याबळ असताना १३ विजयासाठी मॅजिक फिगर अाहे. त्यात मनसेचे ७, राष्ट्रवादी ५, अपक्ष काँग्रेस असे जवळपास १५ इतके संख्याबळ अाहे. या ठिकाणी युतीचे संख्याबळ असले तरी भाजपला झटका देण्यासाठी शिवसेना तटस्थ राहण्याची शक्यता अाहे. दरम्यान, भाजपने मनसेच्या उमेदवारालाच हायजॅक करून झटका देण्याचे प्रयत्न चालविले अाहे. नाशिक पूर्वमध्ये १३ ही विजयासाठी मॅजिक फिगर असून, येथे भाजप शिवसेना असे जेमतेम संख्याबळ अाहे. मात्र, अलीकडेच मनसेच्या चार नगरसेवकांनी भाजपत, तर राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाने शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे हेच संख्याबळ इतके झाले अाहे. तिकडे महाअाघाडीत मनसेचे ५, राष्ट्रवादी ४, काँग्रेसचे ४, अपक्ष असे १६ संख्याबळ असल्यामुळे त्यांचा सभापती हाेणे जवळपास निश्चित मानले जात अाहे. नाशिक पश्चिममध्ये गेल्यावेळीप्रमाणे मनसेच्या उमेदवाराला हायजॅक करण्याची भाजपची खेळी यशस्वी हाेण्याची शक्यता कमी अाहे. या ठिकाणी काँग्रेसच्या शिवाजी गांगुर्डे यांना महाअाघाडीने रिंगणात उतरवतानाच अापल्या बंडखाेर नगरसेवकांना काँग्रेसला मतदान करण्याचा पक्षादेश बजावला अाहे. मनसेचे बंडखाेर वगळता संख्याबळ असून, राष्ट्रवादी १, काँग्रेस असे सदस्य हातात अाहे. विजयासाठी मॅजिक फिगर असून, मनसेचे दाेन बंडखाेर तटस्थ राहिल्यास विजयासाठी संख्याबळ निर्णायक ठरेल. भाजपचे मूळ ३, तर शिवसेनेचे असे पाच संख्याबळ अाहे. या पार्श्वभूमीवर मनसेच्या दाेन बंडखाेरांची भूमिका निर्णायक ठरणार अाहे.

सिडकाेत काँग्रेसच्या अिश्वनी बाेरस्ते
सिडकाेत २२ सदस्य असून, १२ मॅजिक फिगर अाहे. माकपचे गटनेते तानाजी जायभावे हे तटस्थ असल्यामुळे ११ मते निर्णायक हाेती. मनसेचे अरविंद शेळके हे शिवसेनेत गेल्यानंतर उर्वरित ६, राष्ट्रवादी ३, काँग्रेस असे ११ संख्याबळ हाेत हाेते. दुसरीकडे शिवसेनेचे ८, जनराज्यचे असे दहा संख्याबळ हाेते. त्यातही शिवसेनेचे बडगुजर मतदानासाठी नसल्यामुळे तसेच जनराज्यचे नगरसेवक तथा भाजप अामदार अपूर्व हिरे हेही अनुपस्थित असल्यामुळे महायुतीचे गणित जमणे अवघड हाेते. शिवसेनेच्या कल्पना पांडे यांनी माघार घेतल्यावर बाेरस्ते यांची निवड झाली. मनसेच्या कांचन पाटील सुवर्णा मटाले यांनी माघार घेतली.

नाशिक राेडला शिवसेनेचे लवटे
२४ जागांपैकी १३ ही मॅजिक फिगर असताना मनसेचे दाेन सदस्य अपात्र ठरल्यामुळे या ठिकाणी शिवसेनेला स्वत:चे ८, रिपाइं २, भाजप असे १२ इतके स्पष्ट बहुमत दिसत हाेते. मात्र, महाअाघाडीशी केलेल्या छुप्या युतीच्या जाेरावर या ठिकाणी काेणीही अर्ज दिलाच नाही. परिणामी, या ठिकाणी शिवसेनेने रिपाइंचे सुनील वाघ काँग्रेसच्या शिला भागवत यांना पक्षांतरबंदी कायद्यासंबंधातील संभाव्य कारवाईवरून थांबवत सूर्यकांत लवटे यांना चाल दिली त्यांची अविराेध निवड झाली.

सातपूरला मनसेच्या सविता काळे
१४सदस्य असलेल्या सातपूर प्रभाग समिती सभापतिपदासाठी संख्याबळ निर्णायक हाेते. या ठिकाणी मनसेच्या ६, राष्ट्रवादी २, काँग्रेस असे संख्याबळ हाेते. दुसरीकडे माकपच्या सचिन भाेर, नंदिनी जाधव यांना तटस्थ राहण्याचे अादेश असल्यामुळे शिवसेना-रिपाइंचे २, तर भाजप असे अवघे तीन संख्याबळ हाेते. त्यातही महायुतीने स्वत:चे ३, माकप महाअाघाडीतील नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले हाेते. मात्र, गणित जमत नसल्याचे बघून अखेर मनसेच्या सविता काळे यांची अविराेध निवड झाली. या ठिकाणी गंमत म्हणजे, शिवसेनेने माकपच्या जाधव यांना उमेदवारी दिली, मात्र तसे केल्यास पक्षादेश माेडेल हे बघून जाधव यांनी अखेरच्या क्षणी माघारीसाठी अाटाेकाट प्रयत्न केला. या गोंधळात जेव्हा मतदान झाले तेव्हा चक्क जाधव यांनी स्वत:चेच मतदान प्रतिस्पर्धी महाअाघाडीच्या उमेदवार काळे यांना देऊन टाकले.