आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेवर बँक खाते जप्तीची टांगती तलवार,‘भविष्यिनधी’ तर्फे थकीत वसुलीसाठी नाेटीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशिक महापालिकेने राबविलेल्या एका उपक्रमांतर्गत कामावर घेतलेल्या कर्मचाऱ्यांची भविष्य निधीची रक्कम भरल्याप्रकरणी कर्मचारी भविष्य निधी कार्यालयाने वसुलीची नाेटीस बजावली असून, ही रक्कम वेळेत भरल्यास पालिकेचे बँक खाते जप्त हाेण्याची शक्यता अाहे. धुळे, जळगाव महापालिका अन्य काही नगरपालिकांवर भविष्य निधीचा भरणा करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारची कारवाई करण्यात अाली हाेती. त्यांची बँक खातीही गाेठविण्यात अाली हाेती. मात्र, सिंहस्थ कुंभमेळा सुरू असल्याने नाशिक महापालिकेवरील अशी कारवाई प्रशासनाने टाळले हाेते.

विविध अास्थापनांनी कर्मचाऱ्यांची थकित भविष्य निधी रक्कम भरणा करावी, यासाठी क्षेत्रीय भविष्य निधी कार्यालयाकडून प्रयत्न केले जात अाहेत. याच अनुषंगाने गतवर्षी विशेष वसुली मोहिमेत निफाड साखर कारखाना, जिल्हा दूध संघाच्या मशिनरीज््वर जप्तीची कारवाई झाली हाेती. नाशिक महापालिकेकडेही विविध उपक्रमांतर्गत काम करत असलेल्या काम केलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती वारंवार मागण्यात अालेली अाहे. मात्र, अद्यापही माहिती देण्यात अालेली नसल्याची माहिती सूत्रांनी िदली. दरम्यान, पालिकेने राबविलेल्या रिप्राॅडक्टिविटी चाइल्ड प्राेग्रॅममधील कामगारांना जानेवारी ते नाेव्हेंबर २०१५ या कालावधीतील भविष्यनिधीची थकीत रक्कम, तसेच दाेन कंत्राटांत काम केलेल्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य िनधीची एकूण ३२ लाख ६६ हजार रुपयांची थकित रक्कम तातडीने भरण्यात यावी, अशी नाेटीस क्षेत्रीय भविष्य िनधी कार्यालयाकडून बजावण्यात अाली. ही रक्कम निर्धारित वेळेत भरल्यास पालिकेवरही बँक खाते जप्तीची कारवाई करून ही रक्कम वसूल केली जाऊ शकते, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

अनेक प्रकरणांची माहिती अद्यापही नाही
महापालिकेकडेभविष्य निधी कार्यालयाने विविध कंत्राटांव्दारे काम केलेल्या करत असलेल्या कर्मचाऱ्यांची, तसेच विविध उपक्रमांत कार्यरत कर्मचाऱ्यांची माहिती गतवर्षापासून मागविण्यात अालेली अाहे. मात्र, अद्यापही अशी माहिती महापालिकेने दिली नसल्याचे समजते. महापालिकेचा हा हलगर्जीपणा असाच राहीला तर मात्र जळगाव, धुळे महापालिकांकडून ज्याप्रकारे बँक खाते जप्त करून थकीत भविष्य निधीची रक्कम जप्त केली गेली, त्याचप्रमाणेच नाशिक महापालिकेवर कारवाई हाेवू शकते.
बातम्या आणखी आहेत...