आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका बहुसदस्यीय प्रभागाची हंडी फुटणार पुढील अाठवड्यात, १० टक्के मतदानवाढीचे लक्ष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजण्यासाठी थाेडाच अवधी असल्याचे स्पष्ट संकेत देत राज्य निवडणूक अायुक्त जे. एस. सहारिया यांनी महापालिका अायुक्तांना पुढील अाठवड्यात बहुसदस्यीय प्रभाग रचना जाहीर हाेण्याची शक्यता धरून सज्ज राहावे, असे अादेश दिले. पाच, चार वा तीन यापैकी काेणत्या पद्धतीची प्रभाग रचना हाेईल हेही त्याचवेळेस स्पष्ट केले जाणार असून तूर्तास जास्तीत जास्त मतदान हाेण्याच्या दृष्टीने प्रशासकीय खर्चाची भीडभाड ठेवता नियाेजन करावे, असेही अावाहन त्यांनी केले.

राज्यातील दहा महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तयारीचा अाढावा घेण्यासाठी सहारिया यांनी महापालिका अायुक्तांची व्हिडिअाे काॅन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत नाशिकचे अतिरिक्त अायुक्त अनिल चव्हाण सहभागी झाले. यावेळी सहारिया यांनी प्रभाग नेमका किती संख्येचा हाेईल हे लवकरच जाहीर हाेणार असून त्या दृष्टीने मतदारांचे नियाेजन करण्याचे अादेश दिले. प्रामुख्याने चार प्रभाग झाल्यास मतदारांना एकाच वेळी चार मते द्यावी लागतील. त्यासाठी अवधी अधिक लागेल. अशा परिस्थितीत सर्वसाधारणपणे एक हजार मतदारामागे एक बूथ हे गृहीतक माेडावे लागेल. साधारणपणे ७०० मतदारांमागे एक बूथ असे नियाेजन करावे लागणार असून त्या दृष्टीने तयारी ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. थाेडक्यात, बहुप्रभाग पद्धतीमुळे बूथची संख्याही वाढणार अाहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भयमुक्त निवडणुकीची संकल्पना असून त्यासाठी प्रतिमतदार प्रशासनाला ३५ रुपये इतक्या खर्चाची मर्यादा यापुढे असणार नाही. ताे विचार बाजूला ठेवून जास्तीत जास्त पारदर्शी मतदान हाेण्यासाठी प्रयत्न करावे, असेही अादेश त्यांनी दिले.

मद्य गुंडांचा बीमाेड करा
निवडणुकीतदडपशाही करणाऱ्या गुंडांच्या मुसक्या अावळण्यासाठी महापालिका अायुक्तांनी पाेलिस अायुक्तांची मदत घ्यावी, असे सहारिया यांनी सांगितले. अायुक्तांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेतही बैठक घेऊन मद्याचा अवैधरित्या हाेणारा वापर नियंत्रणात अाणावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जास्तीत जास्त मतदारनाेंदणीचे उद्दिष्ट ठेवण्याचे अावाहन सहारियांनी केले. महाविद्यालयीन तरुणांच्या मतदार नाेंदणीसाठी याच ठिकाणी नाेडल अाॅफीसर नेमण्याच्या सूचना केल्या. जानेवारी २०१७ पर्यंत अठरा वर्षे पूर्ण असणाऱ्यांना मतदानाचा हक्क मिळणार असून त्याविषयी जागृती करावी असेही सांगितले. मागील तीन निवडणुकांतील सरासरी मतदानापेक्षा १० टक्के मतदानवाढीचे किमान उद्दिष्टही देण्यात अाले. महापालिकेसाठी गेल्या वेळी सरासरी ५५ टक्के मतदान झाले असून या पार्श्वभूमीवर ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदानाचे लक्ष्य पालिकेला ठेवावे लागेल.
बातम्या आणखी आहेत...