आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका विधी विभाग संशयाच्या भाेवऱ्यात, घंटागाडीतही नाकारला सुप्रीम काेर्टाचा पर्याय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापालिकेची अडीचशे अारक्षणे व्यपगत हाेण्याच्या मार्गावर असताना, यापूर्वी न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणांतील अारक्षणे विधी विभागाच्या संशयास्पद भूमिकांमुळे व्यपगत झाल्याचा संशय अलीकडेच एका प्रकरणावरून स्थायी समितीला अाला अाहे.

उच्च न्यायालयाचे निर्णय सहसा सर्वाेच्च न्यायालय बदलत नाही. त्यामुळे अपील करून खर्च करण्यात अर्थ नाही, असे काही महिन्यांपूर्वी विधी विभागाकडून स्थायी समितीत ठामपणे सांगितले गेले असताना, गेल्या महिन्यात उच्च न्यायालयाने पालिकेच्या बाजूने दिलेला निकाल सर्वाेच्च न्यायालयाने बदलल्यामुळे थाेडक्यात कसेही केले तरी पालिकेच्याच विराेधात निर्णय जाण्याची परंपरा कायम राहिल्यामुळे या विराेधाभासामागे नेमके काय घडले, याची माहिती साेमवारच्या सभेत घेतली जाणार अाहे.
पालिका अायुक्त डाॅ. गेडाम यांनी काळ्या यादीत टाकलेल्या घंटागाडीच्या चार ठेकेदारांना निविदा प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे अादेश उच्च न्यायालयाने दिले हाेते. त्यावर सदस्यांनी सुप्रीम काेर्टात दाद मागण्याची इच्छा प्रदर्शित केल्यावर प्रशासनाकडून त्यात वेळ जाईल निर्णय बदलण्याची शक्यता कमी असल्याचे दावे झाले हाेते. मात्र, सभापती सलीम शेख यांनी न्यायालयात नाही तर किमान सुप्रीम काेर्टातील वकिलाचा सल्ला तरी घ्यावा, अशी सूचना केली हाेती. त्यानुसार, सल्ला घेतल्यावर वकिलांनी हायकाेर्टाचा निर्णय बदलला जाणार नाही, असा अभिप्राय दिल्याचे सांगत प्रशासनाने ठेकेदारांना निविदेत सहभागी करून घेतले. त्यामुळे सुप्रीम काेर्ट निर्णय बदलू शकते हे लक्षात घेऊन मागील किती प्रकरणांत वरिष्ठ न्यायालयात दाद मागितली गेली नाही, याचाही हिशेब स्थायी घेईल.

चाैकशी झालीच पाहिजे
स्थायीचा सदस्य असताना विधी विभागाच्या कारभाराविराेधात अावाज उठवला हाेता. साेयीने अारक्षणे उठवण्यासाठी रॅकेट कार्यरत असल्याचे बाेलले जाते. अाता तरी अायुक्तांनी प्रकरणनिहाय सर्वांची चाैकशी करावी. - कुणाल वाघ, नगरसेवक,भाजप

प्रशासनाला जाब विचारणार
यापूर्वी घंटागाडीच्या ठेक्यात सुप्रीम काेर्टात जाण्यात अर्थ नसल्याचे उत्तर दिले हाेते. या पार्श्वभूमीवर मागील सर्व दाव्यांची माहिती स्थायी समितीच्या सभेत घेतली जाईल. - सलीम शेख, सभापती,स्थायी समिती
बातम्या आणखी आहेत...