आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक : महापालिका क्षेत्रात दर हजार मुलांमागे अाता बाराशे मुली, असा वाढला अालेख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नाशिक - स्त्रीभ्रूणहत्या करणाऱ्यांविराेधात सुरू झालेली माेहीम, साेनाेग्राफी सेंटरची तपासणी मागील मार्च महिन्यात जिल्हा शासकीय रुग्णालयातच स्त्रीभ्रूण हत्या करण्याचे उघडकीस अालेल्या प्रकरणाचे चांगले परिणाम दिसू लागले अाहेत. 
 
मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत एक हजार मुलांमागे यापूर्वी अाठशे ते नऊशेच्या सरासरीत असलेल्या मुलींच्या जन्माचे प्रमाण एकाएकी वाढून अकराशे ते बाराशेच्या घरात गेले अाहे. मुलींच्या वाढत्या जन्मदराची बाब महापालिकेबराेबरच सर्वांसाठी सुखावणारी ठरली अाहे. 
गेल्या काही वर्षांत केंद्र राज्य शासनाकडून स्त्रीभ्रूण हत्या थांबविण्यासाठी विविध उपाययाेजना केल्या जात अाहे. मुख्य म्हणजे, असे प्रकार करणाऱ्यांविराेधात कठाेर शिक्षेचे कायदेही अस्तित्वात अाले अाहेत. मात्र, त्यानंतरही वैद्यकीय व्यवसायातील अपप्रवृत्तींकडून स्त्रीभ्रूण हत्येचे प्रकार हाेत असल्याचे बीड तसेच पश्चिम महाराष्ट्रातील घटनेतून उघड झाले. 
जळगाव येथील माता गर्भपातासाठी सुरतमध्ये जात असल्याचेही ‘दिव्य मराठी’ने उघडकीस अाणले हाेते. त्यानंतर सर्वात धक्कादायक प्रकरण म्हणजे कुंपणच शेत खाण्याजाेगा प्रकार ‘दिव्य मराठी’ने मार्च महिन्यात उघडकीस अाणत जिल्हा शासकीय रुग्णालयातील गर्भपाताच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेली जनजागृती, कठाेर कारवाईमुळे स्त्रीभ्रूणांच्या उमलण्याची संख्या वाढल्याचे चित्र निर्माण झाले अाहे. 
 
असा वाढला अालेख 
महापालिकाक्षेत्रात साधारण एक हजार पुरुषांमागे ९२५ स्त्रीभ्रूण असणे अपेक्षित आहे. मात्र, मार्च महिन्यात एक हजार मुलांमागे १११० मुलींचा जन्म झाला. एप्रिल महिन्यात बाराशे तर मे महिन्यात अकराशे मुलींचा जन्म एक हजार मुलांमागे झाला. तत्पूर्वी डिसेंबर २०१६ मध्ये स्त्रीजन्माचे प्रमाण हजारामागे ८८०, जानेवारीत एक हजारामागे ९४० तर फेब्रुवारीत एक हजार मुलांमागे ८९४ मुली असा जन्मदर हाेता. 
 
परवानगीनंतरच गर्भपाताच्या गाेळ्या 
महापालिकाएका अॅपद्वारे बेकायदेशीर गर्भपाताच्या गाेळ्या विकण्यापासून प्रतिबंध घालणार अाहे. गर्भपाताच्या गाेळ्या वापरणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची महापालिकेत नाेंदणी करून अॅपद्वारे मागणी करावी लागेल. थेट अाैषध विक्रेते वा वितरकांकडून गाेळ्या खरेदी करता येणार नाही, असे वैद्यकीय अधिकारी डाॅ. विजय डेकाटे यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...