आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालिकेतील अधिकारी केवळ पुरुषांचीच कामे एेकतात; महिला नगरसेवकांना दुय्यम स्थान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महिलांना ५० टक्के आरक्षण नावापुरतेच असून, महापालिकेतील अधिकारी महिला नगरसेवकांना दुय्यम वागणूक देत पुरुष नगरसेवकांचीच कामे प्राधान्याने मंजूर करीत असल्याचा पाढा नगरसेविकांनी राज्याच्या महिला हक्क कल्याण समितीसमाेर वाचला. महिला बालकांच्या योजनांसाठी अंदाजपत्रकातील राखीव पाच टक्के निधीही अधिकारी परस्पर वर्ग करीत असल्यामुळे महिलांचे कसे सबलीकरण करणार, असा सवालच समितीला करण्यात अाला. त्याची गंभीर दखल घेत समिती अध्यक्षांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याचे तसेच अापल्या अहवालात गंभीर अाक्षेप नाेंदवल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. 


विधानमंडळाच्या महिला हक्क कल्याण समितीने अध्यक्ष डाॅ. भारती लव्हेकर यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी महापालिकेत अंदाजपत्रकात राखीव पाच टक्के निधीतील कामांविषयी विचारणा केल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून महिला विकासाच्या योजनांसाठीचा राखीव निधी पूर्णपणे खर्चच झाला नसल्याची माहिती समाेर अाली. हा निधी परस्पर अन्य विभागांसाठी वळविण्यात आल्याचेही उघड झाल्याने समितीने जोरदार आक्षेप नोंदविले. महिलांसाठी राखीव पदे तसेच व्यापारी संकुलांतील महिला राखीव गाळ्यांच्या वाटपाबाबतही समितीने प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, मुख्यालयात महिलांसाठी स्वतंत्र कक्ष नाही, शासनाने विशाखा समिती कागदावरच असल्याबाबत झाडाझडती घेतली. शहरात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्यामुळे तातडीने महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची उभारणी करण्याचे निर्देश समितीने दिले. महिला स्वच्छतागृहांच्या दुरवस्था अस्वच्छतेबद्दलही समितीने आक्षेप नोंदविले.

बातम्या आणखी आहेत...