आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरावेचक अाता ‘घनकचरा’मध्ये, घराेघरी जाऊन करतील कचरा संकलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहराच्या स्वच्छतेत माेठा वाटा उचलणाऱ्या कचरावेचक महिलांना मुख्य प्रवाहात आणून महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनात सहभागी करून घेण्याबाबत प्रशासनाकडून पावले उचलण्यात येत आहेत. पुणे महापालिकेच्या धर्तीवर हा प्रस्ताव तयार करण्यात येत असून त्यात या महिला खत प्रकल्पात कचरा वेचण्यासाठी जाण्याएेजवी घराेघर फिरून सुका अाेला कचरा संकलित करतील. त्यामुळे या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण हाेणार नाही. बुधवारी झालेल्या खत प्रकल्पातील दुर्घटनेनंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला अाहे.

खत प्रकल्पात कचऱ्याचा ढीग काेसळून एका महिलेसह तिच्या अाठ वर्षांच्या भाचीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि . २८) उघडकीस अाली. त्यानंतर प्रशासनाला जाग अाली असून, कचरावेचक महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाय शाेधायला सुरुवात केली अाहे. त्यातूनच घराेघरी जाऊन कचरा संकलनाची पद्धत पुढे अाली अाहे. अर्थात, यासंदर्भातील विचार प्रशासनाने यापूर्वीच केला हाेता. परंतु, खत प्रकल्पातील दुर्घटनेनंतर तातडीने या विचाराचे प्रस्तावात रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात अाला अाहे.

शहरात सुमारे दोन हजार कचरावेचक महिला असून, कचरा डेपाेत त्यातील ४० महिला काम करतात.

रस्त्यांवर, गटारात, डम्पिंग ग्राउंडवर जमा झालेल्या कचऱ्यातून भंगारात विकले जाणारे कागद, बाटल्या, लाकूड, लोखंड इत्यादी सामान बाजूला करणारे कचरावेचक शहरातील कचरा
व्यवस्थापनाचा भाग आहेत. मात्र, आजवर पालिकेने त्यांच्याकडे फारसे लक्ष िदले नाही. अाता कचऱ्यावर उपजीविका चालवणाऱ्या या महिलांनाच घनकचरा व्यवस्थापनात सहभागी करून घेण्याचा विचार पालिका करत आहे. त्यासाठी पालिकेकडून त्यांना काही ठिकाणी सुका कचरा वर्गीकरणासाठी शेड उभारून देण्यात येणार अाहे. दरम्यान, खत प्रकल्पात मृत्युमुखी पडलेल्या दाेघींना नुकसानभरपाई मिळावी, या मागणीचे निवेदन लाेकराज्य कचरा, पत्रा, कामगार संघटनेच्या वतीने देण्यात अाले. या वेळी हेमलता पाटील, राजू देसले, राजपालसिंग शिंदे, सरला कमाेद, संताेष जाधव, याेगेश कापसे, संगीता साळवे, शरद चव्हाण अादी उपस्थित हाेते.

महिलांनामिळणार अाेळखपत्र : याकामासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या महिलांना महापालिकेच्या वतीने अाेळखपत्र देण्यात येईल. परंतु, तत्पूर्वी संबंधित महिलेचे गुन्हेगारी रेकाॅर्ड तपासून पाहिले जाईल.

अभियानातून प्रकल्प
राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येईल. यात कचऱ्याचा प्रकल्प उभारून त्यातील सुका कचरा संकलित करण्याचे काम या महिलांना दिले जाईल.- जीवन साेनवणे, अतिरिक्तअायुक्त

अशी अाहे उपाययाेजना
- कचरावेचक कामगारांना महापालिकेचे अाेळखपत्र.
- संबंधित कामगारांना गणवेश.
- या विषयावर काम करणाऱ्या संघटनांना विश्वासात घेऊन त्यांच्यामार्फतच हे काम.
- या महिलांच्या छाेट्या उद्याेगांना पुनर्वापर प्रक्रियेसाठी जागेची व्यवस्था.
- कचरावेचक कामगारांच्या बचत गटांना कमी व्याजदराने म्हणजे तीन टक्के दराने कर्ज.
बातम्या आणखी आहेत...