आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हरकती विचारात घेतल्याने इच्छुकांत नाराजी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विभागीय अायुक्तांनी महापालिका निवडणुकीसंदर्भात सादर केलेल्या प्रारूप प्रभागरचनेला राज्य निवडणूक अायाेगाने शुक्रवारी अंतिम मान्यता दिली, मात्र अायाेगाने या रचनेवर घेतलेल्या हरकतींचा विचार केल्यामुळे हरकत घेतलेल्या निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांचा हिरमाेड झाला अाहे.
महापालिकेने १२२ जागांसाठी चार सदस्यीय पद्धतीनुसार एक याप्रमाणे तयार केलेल्या ३१ प्रभागांच्या प्रारूप प्रभागरचनेला निवडणूक अायाेगाने शुक्रवारी अंतिम मान्यता दिली. प्रारूप रचनेवर ३२ हरकती घेण्यात अाल्या हाेत्या, मात्र केवळ किरकाेळ बदल करून या प्रारूप प्रभागरचनेवर शिक्कामाेर्तब करण्यात अाले अाहे. त्यामुळे हरकत घेतलेल्या विद्यमान नगरसेवक, माजी नगरसेवकांसह इच्छुकांचा चांगलाच हिरमाेड झाला अाहे. महापालिकेने तयार केलेल्या प्रभागरचनेला नगरसेवक शैलेश ढगे, माजी नगरसेविका सत्यभामा गाडेकर भगवान भाेगे यांच्यासह अजिंक्य साने, काैस्तुभ परांजपे अादींनी वेगवेगळ्या प्रकारच्या हरकती घेतल्या हाेत्या. यात पंचवटीतील गुजराथी बांधवांचा झाेपडपट्टीचा समावेश करण्याबाबत तसेच नेहरूनगरच्या पाठीमागील परिसरातील नाल्यावर असलेल्या झाेपडपट्टीचा त्याच प्रभागात समावेश कायम ठेवल्याबाबत, रेल्वे लाईन दारणा नदी क्राॅस करण्यात अाल्याच्या कारणाहून प्रभागरचनेबाबत हरकती घेण्यात अाल्या हाेत्या. या हरकतींवर प्रधान सचिव दीपक कपूर यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी हाेऊन हरकतदार अाणि महापालिका या दाेघांच्या म्हणण्याचा एकत्रित अहवाल निवडणूक अायाेगाने घेतला. या हरकतींबाबत प्रशासनाने निवडणूक अायाेगास अापले म्हणणे पटवून दिल्याने त्यात काेणत्याही स्वरूपाचा बदल करण्यात अालेला नाही. मात्र, यामुळे हरकती नाेंदवणाऱ्या पालिका निवडणुकीतील इच्छुकांत नाराजी अाहे.
बातम्या आणखी आहेत...