आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वेक्षणाद्वारेच भाजप उमेदवारांची निश्चिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अन्य पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश केला म्हणजे उमेदवारी निश्चित हाेईलच याची शाश्वती पक्षाचे पदाधिकारीही देताना दिसत नाही. गेल्या काही वर्षांपासून उमेदवारी निश्चितीसाठी सर्वेक्षण पद्धतीवर भाजपने जाेर दिला असून, नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी स्थानिक अाणि प्रदेश अशा दाेन पातळ्यांवर उमेदवारांचे सर्वेक्षण करण्यात येणार अाहे. त्यामुळे पक्षात प्रवेश घेतला वा ज्येष्ठ पदाधिकारी अाहाेत म्हणून उमेदवारी मिळालीच अशा गैरसमजुतीत कुणी राहू नये, असे पक्षाच्या कार्यकर्त्यांना अाता सांगण्यात येत अाहे.
तब्बल २७४ उमेदवारी अर्ज दाखल
पक्षाच्या वतीने इच्छुकांची उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, १२२ जागांसाठी अाजवर तब्बल २७४ अर्ज पक्षाकडे जमा झाले अाहेत. विशेष म्हणजे, अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीला अजून तीन दिवस शिल्लक अाहेत. त्यानंतर २५ डिसेंबरच्या दरम्यान मुलाखतींची प्रक्रिया राबविली जाणार अाहे.

प्रत्येक जागेसाठी चार ते पाच इच्छुक
^उमेदवारी अर्जभरण्याच्या प्रक्रियेस माेठा प्रतिसाद मिळत अाहे. प्रत्येक जागेवर चार ते पाच इच्छुक दावा करतील, असा अंदाज अाहे. अर्थात सर्वेक्षणाद्वारेच उमेदवारांची निवड हाेणार अाहे. -अामदारबाळासाहेब सानप, शहराध्यक्ष

अशी राबविली जाणार प्रक्रिया?
भाजपमध्ये काेअर, निवड मंडल अशा तीन समित्यांमार्फत निवडणुकीचे नियाेजन हाेते. मंडल समिती अापला अहवाल निवड समितीला सादर करते अाणि निवड समिती ताे काेअर समितीसमाेर सादर करते. त्यानंतर ही समिती प्रदेश कार्यकारिणीसमाेर अहवाल सादर करते. यातील मंडल समितीने सर्वेक्षणाचे काम सुरू केले अाहे. इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज भरून घेतल्यानंतर त्यावर विचारविनिमय करून उमेदवारी निश्चितची पद्धत अन्य पक्षांत असते. भाजप मात्र काही वर्षांपासून सर्वेक्षणावर भर देत अाहे. जनतेने सुचविलेल्या इच्छुक उमेदवारांवर शिक्कामाेर्तब करण्याचे पक्षाचे धाेरण अाहे.
बातम्या आणखी आहेत...